Thursday, December 12, 2024
Homeआरोग्यकोरोनाराज्यात कोरोनाच्या १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री...

राज्यात कोरोनाच्या १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

(मुंबई) :-  राज्यात आज २ हजार २१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.८१ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ६० हजार ३५७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८ हजार ३०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २० हजार ४८० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

      आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख ८४ हजार ६३० नमुन्यांपैकी २ लाख ९२ हजार ५८९ नमुने पॉझिटिव्ह (१९.७ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख २४ हजार ६०२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार २८४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

       राज्यात आज २५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.९१ टक्के एवढा आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय