नागपूर : आज, १५ डिसेंबर रोजी नागपूर येथील राजभवनात महायुती सरकारच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. संध्याकाळी ४ वाजता होणाऱ्या या सोहळ्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा समावेश असलेल्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. (Maharashtra Cabinet)
महायुती सरकारच्या कोणत्या आमदारांना मंत्रीमंडळात स्थान द्यायचे, त्यांना वरीष्ठांकडून फोन करण्यात येत आहे. आता पर्यंत अनेक आमदारांना मंत्री पदासाठी फोन आलेले आहे. असे असले तरी मंत्रीपदी वर्णी लागणाऱ्या आदारांची नावे अद्याप अधिकृत रित्या जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र आज महायुती सरकारमध्ये एकूण ४३ मंत्री शपथ घेणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आज होणाऱ्या शपथविथी सोहळ्यात भाजपचे २१, शिवसेना (शिंदे गट) चे १२ आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे १० मंत्री असे एकूण ४३ मंत्री शपथ घेण्याचा अंदाज आहे.
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची नावे
भाजपकडून देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, नितेश राणे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, राहुल कुल, माधुरी मिसाळ, संजय कुटे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर या नेत्यांचा समावेश असू शकतो.
शिवसेना (शिंदे गट) चे संभाव्य मंत्री
शिवसेनेच्या शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे, उदय सामंत, शंभूराजे देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाठ, भरत गोगावले, आशिष जयस्वाल, योगेश कदम, विजय शिवतारे, आबिटकर किंवा यड्रावकर या प्रमुख नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून अजित पवार, छगन भुजबळ, आदिती तटकरे, अनिल पाटील, संजय बनसोडे, मकरंद पाटील, नरहरी झिरवाळ, धनंजय मुंडे, सना मलिक, इंद्रनील नाईक यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश असू शकतो.
१६ डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन नवे मंत्री शपथ घेणार आहेत. महायुती सरकारच्या या विस्ताराकडे राज्यभरातील जनतेचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Cabinet
हे ही वाचा :
ब्रेकिंग : जळगाव येथे बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, २१ जखमी
ब्रेकिंग : …म्हणून अल्लू अर्जुनला जेलमध्ये काढावी लागली रात्र
खुशखबर : लाडकी बहीण योजनेचा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार, महत्वाची माहिती समोर
लोकसभेत प्रियांका गांधी यांची मोदी सरकार जोरदार टीका, राजा वेश बदलतो…
काश्मीर मध्ये मायनस तापमान, उत्तर भारतासह महाराष्ट्रात थंडीची लाट कायम
मोठी बातमी : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक, वाचा काय आहे प्रकरण !
मोठी बातमी : सर्वात कमी वयात डी. गुकेश ने वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकत रचला इतिहास