Friday, April 4, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Loksabha: ‘अजित पवारांची दुसरी बायको…’, जयंत पाटील यांचे खळबळजनक वक्तव्य

Loksabha Election 2024 : नुकतंच मुरुडमध्ये शेतकरी कामगार पक्ष (Peasants and Workers Party of India) चा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात जयंत पाटील (Jayant Patil) यांची सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. Loksabha

---Advertisement---

सुनील तटकरे म्हणजे अजित पवारांची दुसरी बायको असल्याचं विधान त्यांनी केलं. जयंत पाटील यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

पुढे बोलताना त्यांनी, “सुनील तटकरे यांना त्यांचे बंधू अनिल तटकरे यांनी मोठे केलं. पण शेवटी त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला. सुनील तटकरे आता पुन्हा निवडणुकीला उभे राहणार नाहीत अशी स्थिती करायची आहे. अपमानाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे,” असा निर्धार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

---Advertisement---

जे पक्ष सोडून गेले आहेत, त्यांची पर्वा न करता शेकापचा लाल बावटा घेऊन सर्वांनी वेगळ्या उमेदीने कामाला लागा असं आवाहन यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. तसंच शेकाप कधीही संपणार नाही असा इशाराही दिला. दरम्यान यावेळी त्यांनी सुनील तटकरेंचा उल्लेख अजित पवारांची दुसरी पत्नी असा केला. सुनील तटकरे म्हणजे अजित दादांची दुसरी बायको असं ते म्हणाले.

शेतकरी कामगार पक्ष दिलेला शब्द पाळतो. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये अनेकांवर विश्वास ठेवून त्यांना शेतकरी कामगार पक्षाने जिंकून आणले आहे. त्याच पक्षाला संपविण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मार्गाने केला जात आहे असा आरोप यावेळी त्यांनी केला.

शेतकरी कामगार पक्ष संघर्षातून निर्माण झाला असून एकनिष्ठ व स्वाभीमानी आहे. ही पक्ष गरीबांची बांधिलकी असणारा आहे याची जाणीव विरोधकांनी ठेवली पाहिजे. शेतकरी कामगार पक्ष कधीही न संपणारा पक्ष आहे असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अभिनेता गोविंदा यांचा राजकारणात प्रवेश, ‘या’ पक्षात केला प्रवेश

मोठी बातमी : दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, खुब्याला मार तर हाथ फ्रॅक्चर

तुम्ही तर पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं प्रकाश आंबेडकर यांचा संजय राऊतांवर घणाघात

शिवनेरीवर कोल्हे आणि आढळराव आमने – सामने, भेटीचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल !

मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles