Ambegaon : आंबेगाव तालुक्यातील कोळवाडी या गावात मागील वर्षभर तीन साक्षरता वर्ग सुरू आहेत. या साक्षरता वर्गामध्ये सुमारे चाळीस पेक्षा अधिक महिला साक्षर झालेल्या आहेत. या साक्षरता वर्गात लेखन, वाचन व अंकगणित महिलांना शिकवण्यात आले होते.या महिलांनी मागील वर्षभर जे लेखन, वाचन व अंकगणिताची कौशल्ये आत्मसात केलेली आहेत याची चाचणी घेण्यासाठी नुकतीच मूलभूत साक्षरता परीक्षा घेण्यात आली होती.
ही मूलभूत साक्षरता परीक्षा सर्व नवसाक्षर महिलांनी आनंदाने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. मूलभूत साक्षरता परीक्षा देणाऱ्या सर्व नवसाक्षर महिलांचे आदिम संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
रोटरी क्लब ऑफ पुणे, कोथरूड, इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड पुणे, रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो यांचे सहकार्य व आदिम संस्थेच्या स्थानिक संयोजनातून मागील वर्षेभर साक्षरता वर्ग सुरू होते. या साक्षरता वर्गामध्ये लेखन, वाचन व अंकगणिता बरोबरच आर्थिक साक्षरता, कायदे साक्षरता, आरोग्य साक्षरता, आरोग्य विषयक विविध शिबिरे इत्यादी ही कार्यक्रम घेण्यात आले होते.
या सर्व महिलांनी साक्षरतेचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे त्यांची ही साक्षरता विषयक परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत जे – जे पास होणार आहेत त्या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हा प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम लवकरच संस्थेच्या वतीने घेण्यात येणार आहे.
या पुढील काळात या नवसाक्षर महिलांसाठी त्यांच्या वस्ती पातळीवर छोटेखानी ग्रंथालय सुरू केले जाणार आहे. नवसाक्षर महिलांनी आत्मसात केलेले वाचन कौशल्य, लेखन कौशल्य विकसित होण्यासाठी तसेच त्यांना त्यांचा विसर पडू नये म्हणून संस्था पुढील काळात विशेष काळजी घेणार आहे.
या साक्षरता वर्गात शिकवण्याचे काम सुप्रिया मते, प्रियांका बुरसे व सुनंदा डगळे यांनी केले होते. व त्यांना ग्रामपंचायत कोळवाडी – कोटमदरा चे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील यांनी ही आवश्यक ते सहकार्य केले होते. तर आदिम संस्थेचे डॉ. अमोल वाघमारे, राजू घोडे,ऍड. मंगल तळपे,समीर गारे, प्रा. स्नेहल साबळे, दीपाली वाळकोली, अविनाश गवारी यांनी स्थानिक संयोजनाचे काम केले होते.
Ambegaon


हेही वाचा :
मोठी बातमी : शिंदेच्या शिवसेनेत पुन्हा भुकंप होणार ? अनेक आमदार ठाकरेंच्या संपर्कात
ब्रेकिंग : नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी टाकला बाँम्ब
मोठी बातमी : कर्ज घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, RBI ने घेतला मोठा निर्णय !
लोकसभा निवडणुक संपली तरी ‘या’ मतदारसंघात राहणार आचारसंहिता, वाचा काय आहे कारण !
साफसफाई करताना पाण्यात “हे” वापरा , मुंग्या, झुरळ होणार नाहीत
10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना विविध विभागात नोकरीची सुवर्णसंधी
ब्रेकिंग : नवनिर्वाचित खासदार कंगना रणौतला थप्पड मारणारी महिला जवान निलंबित
एकही जागा न मागता मी सपोर्ट केला मला कॅबिनेट मंत्री करा – रामदास आठवले
मोठी बातमी : लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी “यांच्या” नावाची चर्चा
राहुल गांधी यांना एका खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार, वाचा काय आहे कारण !
मोठी बातमी : लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या पदासाठी “यांच्या” नावाची चर्चा