Saturday, December 21, 2024
Homeजिल्हाकामगारांचा जीव स्वस्त झाला ? कामगार मृत्यू होणारे प्रकल्प पाच वर्षासाठी बंद...

कामगारांचा जीव स्वस्त झाला ? कामगार मृत्यू होणारे प्रकल्प पाच वर्षासाठी बंद करा – काशिनाथ नखाते

येरवडा दुर्घटनेतील मृत कामगारानां आदरांजली

पिंपरी : शास्त्री चौक येरवडा याठिकाणी  ब्लू ग्रास बीझनेस पार्क या साइटवर स्लॅब चे काम करणाऱ्या सात कष्टकरी कामगारांचा काल स्लैब कोसळून मृत्यू झाला या घटनेचा तीव्र शोक व्यक्त करत सदरच्या कष्टकरी कामगारांना कुटुंबियांना अर्थ साहाय्य मिळावे त्याचबरोबर ज्या प्रकल्पावर मृत्यू होतील, अशा प्रकल्पांची पाच वर्षासाठी परवानगी रद्द करावे, असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कष्टकरी संघर्ष महासंघ व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज चिंचवड येथे मृत कामगारांना मेणबत्त्या पेटवून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! परिक्षेच्या सरावासाठी मिळणार Question Bank !

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, महासचिव चंद्रकांत कुंभार, निमंत्रक नाना कसबे, सुरज देशमाने, भास्कर राठोड, सालिम डांगे, किसन चव्हाण, माधुरी जलमुलवार, प्रभाकर पवार, अर्चना कांबळे, सुनंदा मोरे, आनंद शिंदे, रंजना गायकवाड, संगीता कांबळे आदी उपस्थित होते‌.

पुढे नखाते म्हणाले की, महाराष्ट्र राज्यातील कामगारांची सुरक्षा वाढवावी याबाबत वारंवार मुख्यमंत्री, कामगार मंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करून संपर्क केला आहे. त्यानुसार  राज्याच्या सहाय्यक कामगार आयुक्ताने संबंध महाराष्ट्रासाठी कामगार सुरक्षा पुरवणे बाबत स्वतंत्र आदेश काढण्यात आलेले आहेत. मात्र याची अंमलबजावणी महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी होत नाही. दरम्यान आज अजित पवार यानी मृताच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची जाहीर केले आहे.

‘पुणे ते जुन्नर’ पीएमपीएमएल बससेवेचा पुढील आठवड्यात शुभारंभ

पुणे महानगरपालिकेचा बांधकाम परवानगी विभाग तसेच कामगार विभागाच्या अक्षम्य चुका असल्यामुळे सदरच्या सात कामगारांचा मृत्यू झालेला आहे, असे अपघात व मृत्यू अशा घटना भविष्यामध्ये घडू नये यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कामगारांची सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे हा लक्षात घेऊन ज्या प्रकल्पावर  कामगारांचे सुरक्षा केली जात नाही. अशा प्रकल्पावर मृत्यू झाला त्यांचे बांधकामाची साईट पाच वर्षासाठी बंद करावे, अन्यथा आम्ही बंद पाड़ु असा इशारा त्यानी दिला. सदरच्या अपघाती मृत्यू मुळे कामगार क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय