Thursday, September 19, 2024
HomeNewsसेवा विकास बँकेचा परवाना रद्द, शहरात खळबळ

सेवा विकास बँकेचा परवाना रद्द, शहरात खळबळ


पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : १९७१ मध्ये पिंपरी चिंचवड मध्ये सिंधी समाजातील व्यापाऱ्यांनी सेवा विकास बँक स्थापन केली. सुमारास सेवा विकास बँकेची स्थापना केली. दिवसेंदिवस ही बँक प्रगती करू लागली एकूण २५ शाखा कार्यरत झाल्या.पिंपरी चिंचवड शहरतील या नावाजलेल्या बँकेने शेकडो उद्योजक, व्यापारी, नोकरदार वर्गाच्या आर्थिक गरजा पूर्ण केल्या. त्यानंतर आर्थिक समृद्ध बँकेत राजकारणाचा शिरकाव झाला.

विविध १२४ प्रकरणात तब्बल ४३० कोटी रूपयांचे कर्जवाटप नियमबाह्य पद्धतीने झाले. कर्जफेडीची क्षमता व अन्य आवश्यक बाबींची खातरजमा न करता पैशांचे वारेमाप वाटप करण्यात आले. बँक डबघाईला येऊ लागली. बँकेवर मागील वर्षी रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध घालण्यात आले होते. प्रशासकाची नेमणूक करण्यात आली तरी देखील बँकेच्या कर्ज वसुलीत वाढ झाली नाही. अखेर या बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केल्यामुळे सुमारे ३०० कर्मचारी, शेकडो ठेवीदारांचे भविष्य टांगणीला लागले आहे. बँक कर्मचाऱ्यांनी बँकेसमोर निदर्शने केली आहेत.

Lic
जाहिरात
संबंधित लेख

लोकप्रिय