Wednesday, January 15, 2025
HomeNewsपरवडणाऱ्या घरांसाठी मोठी लढाई करू - काशिनाथ नखाते

परवडणाऱ्या घरांसाठी मोठी लढाई करू – काशिनाथ नखाते

मोदींची पंतप्रधान आवास योजना फसवी

पिंपरी : पंतप्रधान आवास योजना हा कार्यक्रम गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालया द्वारे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १जुन २०१५ रोजी या अभियानाअंतर्गत २०२२ पर्यंत म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील. तेंव्हा सर्वांना घरे देऊ अशी घोषणा मोठ्या धमाक्यात केली. मात्र पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रातील स्थिती पाहिली असता सामान्य नागरिकांना कामगारांना घरे उपलब्ध झालेच नाहीत.

पिंपरी – चिंचवडमध्ये तर घरांची संख्या खूप कमी प्रमाणात आहे. त्यामुळे लाखोच्या संख्येने घरे निर्माण करू, असे आश्वासन दिलं होते. ते फसवे आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून यापुढ़े स्वस्तातील घरांसाठी मोठी लढाई करू, असे प्रतिपादन कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज  “हक्काचे घर मेळावा” आयोजित करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष इरफान चौधरी, संघटक अनिल बारवकर, उपाध्यक्ष राजेश माने, नाना कसबे, महिला विभागाच्या माधुरी जलमुलवार, रंजना माने, अर्चना कांबळे, राजू बिराजदार, सलीम डांगे, ओमप्रकाश मोरया, मंगला देसाई, सखाराम केदार, तुकाराम माने, आसीफ़ शेख, अमृत माने, सुनिता मोरे, मेघा कदम, सुनिता वाघमारे आदिसह शहरातील कामगार बांधव उपस्थित होते.

केंद्र सरकारने सन २०१५ मध्ये सर्वांसाठी घरे योजना जाहीर करून विविध ठिकाणी त्याचा राजकीय लाभ घेतला. मात्र ही योजना किती  यशस्वी झाली हा संशोधनाचा भाग आहे. ज्या  जुन्या घर योजना सुरु होत्या, विविध प्रकल्प सुरू होते त्याच घरांना नाव बदलून पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत घरे असे जाहिर केले. घरांच्या आश्‍वासन ते पूर्ण करू शकले नाहीत. म्हणून नुकतेच केंद्राने प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेला सरकारने २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला, येत्या तीन वर्षांत या योजनेमध्ये सुमारे १.३० कोटी घरे बांधली जाणे अपेक्षित आहे असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी जाहिर केले

केंद्र सरकारने नागरी भागाकरीता प्रधानमंत्री आवास राबविण्यासाठी पिंपरी-चिंचवड पालिकेने सामील होण्याबाबत राज्य सरकारने  पालिकेला कळविले. मनपाने केवळ च-होली येथे १४४२ बो-हाडे वाडी १२८८ रावेत ९३४  एवढेच घर निर्माण होण्याची शक्यता आहे  आज या शहराला ५० हजार घरांची परवडणाऱ्या घरांची गरज असताना केवळ ३६६४ इतक्या कमी घराने काय होणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. तसेच चिखली, पिंपरी, आकुर्डी आणि डुडूळगाव येथील घरांबाबत आश्वासन देण्यात आले.

मात्र, प्रत्यक्षात कामाला किंवा योजनेला सुरुवात झालेली नाही. हे शहराच्या हिताचे नसून या शहरातील श्रमिक, कामगार,कष्टकरी वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक  घरांच्या  प्रतीक्षेत आहेत. पिंपरी-चिंचवड मध्ये  सर्वेक्षणानुसार एक लाख लोकांना घरांची गरज आहे आणि मनपाच्या अर्ज प्रक्रियेमध्ये ही मोठा त्यामध्ये सहभाग नोंदवला होता. यापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिके कडून पेठ क्रमांक १७ आणि १९ चिखली येथे स्वस्त घरांचा यशस्वी प्रकल्प झाला. यामध्ये सुमारे ६२५० नागरिकांना त्याचा लाभ झाला अशा प्रकारच्या मोठ्या योजना होण्यासाठी आणि यापुढे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण द्वारे अधिकाधिक घरी निर्माण होण्यासाठी राज्याचे  उपमुख्यमंत्री अजित पवार  यांचे मार्गदर्शनात आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना भेटून स्वस्त घरांच्या योजनाबाबत पाठपुरावा करणार असल्याचे नखाते यांनी यावेळी जाहीर केले.

प्रस्ताविक दिनेश कदम यांनी केली. सूत्रसंचालन सुधाकर वाघ यांनी तर आभार यासीन शेख यांनी मानले.


– क्रांतिकुमार कडुलकर 

संबंधित लेख

लोकप्रिय