Tuesday, July 23, 2024
Homeजिल्हापिंपरी चिंचवड : ऊस वाहतूक ट्रॉलीना विशिष्ट वेळेत प्रवेश, पोलीस आयुक्त आनंद...

पिंपरी चिंचवड : ऊस वाहतूक ट्रॉलीना विशिष्ट वेळेत प्रवेश, पोलीस आयुक्त आनंद भोईटे यांचा आदेश

पुणे : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कासरसाई येथे श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना आहे. परिणामी वाहतुकीस अडथळा होऊन कोंडी होते. या पार्श्‍वभूमीवर पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी पिंपरी – शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना ठराविक वेळेसाठी बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.

या वाहनांमध्ये उसाचे जास्त वजन असल्याने तसेच, ट्रॅक्‍टरला एकापेक्षा जास्त ट्रॉली जोडल्याने ही वाहने सावकाश धावतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत वाहतुक बंद राहणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते सायंकाळी ५ पर्यंत शहरातून ऊस वाहतुक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा सायंकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर रात्री ९ ते सकाळी ९ पर्यंत ऊस वाहतूक करू शकतात.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय