Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याआशा सेविकांच्या आंदोलनावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक

आशा सेविकांच्या आंदोलनावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांंनी सरकारला घेरले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आशा सेविकांच्या आंदोलनावरुन सरकारला धारेवर धरत सरकारला आशा सेविकांची कदर नाही, असा हल्ला बोल करत आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.

मुंबईतील आझाद मैदान येथे आशा सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. वाढीव वेतनासह अन्य मागण्यांबाबत जोपर्यंत शासन निर्णय जारी होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याची भूमिका आशा सेविकांनी घेतली आहे. यावर सरकारने आशा सेविकांच्या मागण्या मान्य करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेमध्ये केली.

यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासन आशा सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. आंदोलकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. चर्चा करून आशा सेविकांचे प्रश्न सोडवले जातील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

राज्यविधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज २६ फेब्रुवारी २०२४ पासून मुंबई येथे सुरू झाले. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्च पर्यंत चालू राहणार आहे. आज पहिल्या दिवशी विरोधी पक्षांकडून आशा सेविकांचा मुद्दा उचलण्यात आला.

हेही वाचा :

एका दातामुळे आमदार संजय गायकवाड अडचणीत वाढ

मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा मंडप कोसळला, चार जण जखमी

ब्रेकिंग : मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना, आंतरवाली सराटीमध्ये प्रचंड गोंधळ

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप

नशेत तर्रर्र झालेल्या पोरींना उभंही राहता येईना, पिट्याभाईने दाखवली दवाखान्याची वाट

क्राईम : डॉक्टर फोनवर होते, तो आला आणि मानेवर केले 19 वार, नाशिकचा थरकाप उडवणारा VIDEO

संबंधित लेख

लोकप्रिय