पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : चाकण म्हाळुंगे इंगळे औद्योगिक क्षेत्रातील कामगार नेते, स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचे आणि केहिन फ़ाय ( Hitachi Astemo Fie Pvt. Ltd.) कामगार संघटनेचे संस्थापक व कामगारांच्या न्याय हक्कांसाठी सदैव तत्पर असणारे, दमदार कामगार नेते जीवन येळवंडे यांची Hitachi Astemo Employees Union च्या झालेल्या त्रेवार्षिक निवडणुकीमध्ये बहुमताने विजय झाला.
विजयानंतर एकमताने पुन्हा अध्यक्ष पदी निवड झाल्यावर त्यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसह कामगार आयुक्त कार्यालय पुणे जिल्हा उप कामगार आयुक्त अभय गिते यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळेस कंपनीतील मागील काळात कामगारांनवर झालेला अन्याय, अवास्तव झालेली उत्पादन वाढ, तरीसुद्धा कमी वाढलेला पगार आणि काही बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे दोन कामगारांना आपला जीव गमवावा लागला, त्या बद्दल त्यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली.
वरील सर्व विषयांवर कामगारांना योग्य न्याय देण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही निश्चित करू असं आश्वासन कामगार उपआयुक्त यांनी दिले आणि सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
कामगार नेते जीवन येळवंडे यांची कामगार आयुक्तांशी चर्चा कार्यालयाशी चर्चा
संबंधित लेख