Monday, June 24, 2024
Homeराष्ट्रीयKuwait fire : कुवेत मधून 45 भारतीयांचे मृतदेह केरळ मध्ये आणले video

Kuwait fire : कुवेत मधून 45 भारतीयांचे मृतदेह केरळ मध्ये आणले video

कोची : कुवेतच्या अहमदी प्रांतातील दक्षिण मंगफ येथे एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ४९ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 45 भारतीय कामगार मृत झाले, भारत सरकारने हवाई दलाच्या कार्गो विमानाने त्यांचे मृतदेह कोची विमानतळावर आणले, जिथे रुग्णवाहिका आधीच तैनात करण्यात आल्या होत्या. Kuwait fire tragedy

मृत झालेले हे कामगार बहुतांश ऑईल रिफायनरीमध्ये काम करत होते. त्यांच्यात कुशल आणि अर्धकुशल कामगर होते. पाइप फिटर, टेक्निशियन आणि मजूर.हे कुवेतच्या वेगवेगळ्या ऑईल इंडस्ट्रीत काम करत होते. Kochi news

कोची विमानतळाच्या बाहेर पार्थिव नेण्यासाठी 35 रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. घरातील कर्ते पुरुष गेल्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश दिसून आला. Kuwait fire

कुवेतहून मृतदेह घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान प्रथम कोची विमानतळावर आले. येथे केरळमधील रहिवाशांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवले. या घटनेत केरळमधील 23 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. उर्वरित लोकांमध्ये उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि इतर राज्यांतील लोकांचा समावेश आहे. मृतदेह केरळला सुपूर्द केल्यानंतर विमान दिल्ली विमानतळाकडे रवाना झाले.

इतर मृतांमध्ये तामिळनाडूमधील 7, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी 3 आणि बिहार, ओडिशा, कर्नाटक, महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 1 व्यक्तीचा समावेश आहे. या अपघातानंतर भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह कुवेतला गेले होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, भाजपची डोकेदुखी वाढली

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून सुरू होणार

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सरकार ऍक्शन मोड मध्ये

सिक्किममध्ये तिस्ता नदीचा कहर, अनेक भाग पाण्याखाली; 1500 पर्यटक अडकले!

ब्रेकिंग : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची, बातमी शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

अंघोळीच्या साबणाचे तुकडे फेकून देताय ? असा करा उपयोग, हा व्हिडिओ तुमच्यासाठी

ब्रेकिंग : मोफत आधार कार्ड अपडेट संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

‘या’ दोन फायनान्स योजनांतर्गत थकीत कर्जास दंडव्याज माफ

मोठी बातमी : आदिवासी विकास विभागाच्या पदभरतीस तुर्तास स्थगिती, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : मुंबईत १ कोटी रूपये किंमतीचा गांजा जप्त

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय