मुंबई : शिवशाही व्यापारी संघ प्रदेशाध्यक्ष धनंजय ढावरे यांच्या नेतृत्वाखाली मावळ लोकसभा अध्यक्ष दत्तात्रय भेगडे यांच्या सुचनेने तसेच वरिष्ठ उपाध्यक्ष सचिन लिमकर यांच्या आनुमोदनाने कुमार शिवाजी देवकुळे यांची मावळ तालुका अध्यक्षपदी संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी निवड कपालेश्वर गड मध्यवर्ती कार्यालय खंडाळा या ठिकाणाहून जाहीर केली. Kumar Devkule elected as Maval Taluka President!
---Advertisement---
नवनियुक्त मावळ तालुका अध्यक्ष कुमार देवकुळे यांनी सर्वसामान्य जनता, व्यापारी वर्ग, असंघटीत कामगार,माता भगिनी यांच्या समस्या शासन दरबारी मांडून सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द राहण्याच्या सुचना देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी दाखले यांनी शुभेच्छा दिल्या.