कोल्हापूर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज दिनांक 2 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचा निषेध करण्यात आला.
औरंगाबाद येथे भगतसिंग कोश्यारी यांनी बोलताना शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला तसेच समर्थ रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कोण ओळखले असते, अशी चुकीचे वक्तव्य केले होते. त्याबद्दल महाराष्ट्र भर त्यांचा निषेध केला जात आहे.
रशिया आणि युक्रेन युध्द : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली भूमिका जाहीर
यावेळी शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या भगतसिंग कोश्यारी चले जावं, भगतसिंग कोशारी यांची ताबडतोब हकालपट्टी झालीच पाहिजे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विजय असो, लाल बावटे की जय वगैरे घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शहर सेक्रेटरी कॉ. भरमा कांबळे, जिल्हा सेक्रेटरी कॉ.ए. बी. पाटील, कॉ. दत्ता माने, शिवगोंडा खोत, सदा मलाबादे, सुभाष कांबळे, धनाजी जाधव, गोपाळ पोला, दत्ता रावळ, नूर बेलकुडे, प्रभाकर डोईफोडे, हणमंत मुत्तुर वगैरे 50 पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.
तलासरी : माकपचे सुहास सुरती स्वीकृत नगसेवकपदी बिनविरोध निवड !
किसान सभेचे आमरण उपोषण सुरू, चर्चेची पहिली फेरी निष्फळ