Kerala : केरळचे मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते पिनराई विजयन (CM Pinarayi Vijayan) यांनी सोमवारी मलप्पुरम जिल्ह्यामध्ये बोलताना ‘भारत माता की जय’ आणि ‘जय हिंद’च्या घोषणांबाबत मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, या दोन्ही घोषणा पहिल्यांदा दोन मुस्लिमांनी दिल्या होत्या.
पिनराई विजयन (CM Pinarayi Vijayan) म्हणालेत की, ‘भारत माता की जय’ आणि ‘जय हिंद’ या दोन घोषणा दोन मुस्लीम व्यक्तींनी दिल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही घोषणांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याग करणार का?’ असा सवालही केला आहे. Kerala CM
विजयन म्हणाले, ‘अजीमुल्ला खान नावाच्या एका मुस्लीम व्यक्तीने ‘भारत माता की जय’चा नारा दिला होता. याठिकाणी आलेल्या काही संघातील नेत्यांनी आपल्या समोर असलेल्या लोकांना ‘भारत माता की जय’ ची घोषणा देण्यास सांगितलं होतं. ही घोषणा पहिल्यांदा कोण दिली होती? मला माहिती नाही की संघातील लोकांना याची माहिती आहे का नाही, पण ही घोषणा पहिल्यांदा अजीमुल्ला खान यांनी दिली होती, असं विजयन म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, राजकारणातील एका जुने नेते आबिद हसन यांनी सर्वात आधी ‘जय हिंद’चा नारा दिला होता. तसेच मुघल सम्राट शाहजहाँ यांचा मुलगा दारा शिकोह याने मूळ संस्कृतमधील ५० पेक्षा अधिक उपनिषदांचा फारशी भाषेमध्ये अनुवाद केला होता. त्यामुळे भारतीय धर्मग्रंथ जगभरात पोहोचण्यासाठी मदत झाली.
भारतातील मुस्लिमांना पाकिस्तानमध्ये पाठवू इच्छिणाऱ्या संघ परिवारातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना याची माहिती असणे आवश्यक आहे, असं देखील विजयन म्हणाले आहेत. विजयन यांच्या सरकारने केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला (CAA) विरोध केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजप आणि कम्युनिस्ट असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा :
हार्दिक पांड्याने असे काही केले की, पांड्यावर लोक भडकले
शाहरूख खानच्या ‘त्या’ कृतीमुळे लोकांचा संताप
JNU : ‘जेएनयू’ विद्यार्थी संघाच्या निवडणूकीत डाव्यांचा दणदणीत विजय तर भाजप संलग्न अभाविपचा सुपडा साफ
‘बदला’ घेणे एवढाच उद्देश; डॉ.अमोल कोल्हे यांची घणाघाती टीका
वयोवृद्ध आणि दिव्यांगांना ‘सक्षम’ अॅपच्या माध्यमातून मिळणार अधिकच्या सुविधा
…तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू; अजित पवार गट आक्रमक