Rahul gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी आता संसदेत नव्या भूमिकेत दिसणार आहेत. राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतील. काँग्रेसने प्रोटेम स्पीकर भत्रीहरी महताब यांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. 2014 मध्ये मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद गेल्या 10 वर्षांपासून रिक्त आहे. मात्र, आता राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत असणार आहे.
लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या एक दिवस आधी राहुल गांधी (Rahul gandhi) यांना विरोधी पक्षनेते बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी मंगळवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, सीपीपी अध्यक्षांनी प्रोटेम स्पीकर भर्त्रीहरी महताब यांना पत्र लिहून राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याची माहिती दिली आहे. यामुळे राहुल गांधी यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळणार असून या सोबतच अनेक अधिकार मिळणार आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणूक निकालांमुळे काँग्रेसचे मनोबल उंचावले आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखाली विरोधक मोदी सरकारला त्यांच्या निर्णयांवर घेरण्यासाठी आक्रमक भूमिका घेतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Rahul gandhi
दरम्यान, खासदार म्हणून शपथ घेण्यासाठी राहुल गांधी यांनी संविधानाची प्रत सोबत आणली होती. यावेळी त्यांनी राज्यघटनेची प्रत सत्ताधारी पक्षाला दाखवून लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. खासदारपदाची शपथ घेताना राहुल गांधींनी एका हातात संविधानाची प्रतही धरली होती. राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघाचे खासदार आहेत.
हेही वाचा :
मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात सरकारचा मोठा निर्णय
विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मिळणार अनेक अधिकार, मोदी सरकारची होणार अडचण !
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु
१ हजार ९१० आशा सेविकांचे मोबाईल सुविधेतून सक्षमीकरण
अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
२ जुलैपर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करता येणार – जितेंद्र भोळे
मुख्यमंत्र्यांच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या भूमिपूजन दरम्यान मोठी दुर्घटना टळली
मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !
NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती
MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती
ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती