पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (Pune District Cooperative Milk Producers Association) तथा कात्रज दूध डेअरीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कात्रज दूध संघाच्या निवडणुकीत (Katraj Doodh Sangh Election) 16 पैकी 15 जागा जिंकल्या आहेत. निकाल घोषित झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
भगवान पासलकर (वेल्हे), गोपाळराव म्हस्के (हवेली) राहुल दिवेकर (दौंड) आणि अनुसूचित जाती-जमाती गटातून चंद्रकांत भिंगारे हे चार राष्ट्रवादीचे संचालक आहेत. पुरंदरमधून बिनविरोध निवडून आलेले मारुती जगताप हे काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यांना देखील सहकार पॅनेलने पुरस्कृत केले होते. तर 11 जागांसाठी 25 उमेदवार रिंगणात होते. भोरमधून विजयी झालेले अपक्ष उमेदवार दिलीप थोपटे वगळता राष्ट्रवादीने सर्व जागा जिंकल्या आहेत.
सावधान ! “आसनी” चक्रीवादळ तीव्र होणार, अंदमान निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस
मतमोजणीत उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :
• आंबेगाव : एकूण मतदान ४८. राष्ट्रवादीचे विष्णू हिंगे ३५ (विजयी) शिवसेनेचे अरुण गिरे १२ मते, १ अवैध
• भोर : एकूण मतदान ७०. अपक्ष दिलीप थोपटे ३८ (विजयी) दीपक भेलके १९, काँग्रेसचे अशोक थोपटे १२, अवैध १.
• खेड : एकूण मतदान १०६ : राष्ट्रवादीचे अरुण चांभारे ५५ (विजयी) अपक्ष चंद्रशेखर शेटे ५१ .
• जुन्नर : एकूण मतदान १०९ : राष्ट्रवादीचे बाळासाहेब खिलारी ६१ (विजयी), अपक्ष देवेंद्र खिलारी ४७, अवैध १.
आरोग्यवार्ता : कडक उन्हाळ्यात कसे टाळावे आजार, वाचा !
• मावळ : एकूण मतदान २१ : राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत भाजपचे उमेदवार बाळासाहेब नेवाळे १९ (विजयी) लक्ष्मण ठाकर २ – सुनंदा कचरे शून्य मत.
• मुळशी : एकूण मतदान १५ : राष्ट्रवादीचे कालिदास गोपाळघरे ९ (विजयी) रामचंद्र ठोंबरे शून्य मत.
• शिरूर : एकूण मतदान १६८ : राष्ट्रवादीचे स्वप्निल ढमढेरे १३० (विजयी) योगेश देशमुख ३६, अवैध २.
• महिला प्रतिनिधी (2 जागा) ः केशरबाई पवार -शिरूर ५४८ (विजयी), लता गोपाळे – खेड ४३७ (विजयी), रोहिणी थोरात-दौंड ८५, संध्या फापाळे-जुन्नर २०४.
• इतर मागास प्रवर्ग (1 जागा) : राष्ट्रवादीचे भाऊ देवाडे- जुन्नर ४४८ (विजयी), वरूण भुजबळ- जुन्नर १९३, अरुण गिरे – आंबेगाव ३६.
• भटक्या जाती विमुक्त जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ (1 जागा) : राष्ट्रवादीचे निखिल तांबे – रांजणगांव सांडस-शिरुर ४५० (विजयी), प्रदीप पिंगट – बेल्हे- जुन्नर २३४, अवैध १८.