Tuesday, April 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

सावधान ! “आसनी” चक्रीवादळ तीव्र होणार, अंदमान निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस

---Advertisement---

---Advertisement---

पुणे : भारतीय हवामान खात्याने वर्षातील पहिल्या चक्री वादळाबाबत अलर्ट जारी केला आहे. चक्रीवादळ अनेक भागात नाश करू शकते. अंदाजानुसार, २३ मार्च दरम्यान म्यानमारचा किनारा ओलांडण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळाला आसनी नाव देण्यात आलं आहे. आजपासून या चक्रीवादळाचा परिणाम जाणवत आहे. अंदमान निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस कोसळला. उत्तर अंदमान समुद्र व लगतच्या दक्षिण / पूर्व बंगालच्या उपसागरावर तीव्र दाबाचे क्षेत्र तर झाले आहे. येत्या 12 तासांत चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे.

रासायनिक खतांच्या वाढत्या किंमती बाबत हस्तक्षेप करा ! – किसान सभेची मागणी

आसनी  (Asani) हे नाव श्रीलंकेनं सुचवलं आहे. भारतीय तटरक्षक दलाने बंगालच्या उपसागरात आणि अंदमान-निकोबार बेटांमधील सर्व खलाशी आणि मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.

देशातील विविध राज्यात उष्णतेची लाट आली असून हे वादळ किती वेग घेईल याचा अंदाज नाही. परंतु पश्चिम भारताच्या प्रदेशात तुफानी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

कृषी कायदे मागच्या दाराने लागू करण्याचा प्रयत्न – सीताराम येचुरी

आरोग्यवार्ता : कडक उन्हाळ्यात कसे टाळावे आजार, वाचा !


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles