Thursday, December 12, 2024
Homeराजकारण“घर का एक एक सामान बेच दूँगा पर घर नहीं बिकने दूँगा”;...

“घर का एक एक सामान बेच दूँगा पर घर नहीं बिकने दूँगा”; कन्हैया कुमारची केंद्र सरकारवर टीका

(मुंबई) :- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता स्थापन झाल्यानंतर केंद्र सरकारने अनेक मोठ्या आणि जुन्या सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचा धडाका लावला आहे, अशातच आता भारतीय रेल्वेने खासगीकरणाच्या दिशेने पाऊल टाकले असून देशातील १०९ मार्गांवर १५१ आधुनिक रेल्वे गाड्या चालविण्यासाठी खाजगी कंपन्यांकडून निविदा /अर्ज मागविण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर कन्हैया कुमारने केंद्र सरकारवर टीका केली आहे की, “घर का एक एक सामान बेच दूँगा पर घर नहीं बिकने दूँगा”.

     कन्हैय्या कुमारने एक कथा सांगत नाव न घेता केंद्र सरकारवर टीका केली आहे की, वडिलांनी मुलाला सांगितले नवीन घर बांध. त्यावर मुलाने घरातील सगळी जुनी किमती वस्तू एक एक करत विकून टाकले आणि जुन्या घराच्या भिंतीवर “नवीन भारता”चा पोस्टर लावून म्हणाला घरातील “एक एक वस्तू विकून टाकीन पण घर नाही विकून देणार” अशी टीका कन्हैयाने केली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय