कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कामगार कल्याण केंद्र कोल्हापूर च्या वतीने आयोजित ऑनलाईन कविसंमेलन संपन्न झाले, अशी माहिती केंद्र संचालक संघसेन जगतकर यांनी दिली.
लाॅकडाऊन काळात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने फिजिकल डिस्टन्सिंग हा आदेश दिलेला आहे. याकरिता कामगार कल्याणकारी उपक्रम राबविले जात आहे. हाच उद्देश घेऊन काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते.
तीन तास चाललेल्या ऑनलाईन कामगार कविसंमेलनात महाराष्ट्रातील विविध भागातील कवी, दोन प्रतिथयश कवी, तसेच दोन मंडळाचे कर्मचारी कवी सहभागी झाले होते. कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागातून कवींनी आपली हजेरी लावली. एस. टी महामंडळ, महावितरण, बँका, साखर कारखाने, प्रायव्हेट कारखाने, छोट्या आस्थापना, शासकीय मुद्रणालय मधील कामगार तसेच कुटुंबिय कवींनी आपल्या रचना सादर केल्या.
या कविसंमेलनात संग्राम त्रेपणकर, जितेंद्र सोनवणे, साताप्पा सुतार, मंगेश कांबळे, दिलीप गायकवाड, प्रमोद व्हरांबळे, शाहिन चौगले, प्रताप घेवडे, माधुरी पंडित, प्रमोद चांदेकर, सुभाष वाणी, संजय जमदाडे, सिद्धेश्वर, मुकुंद जोशी, कवी गोइलकर, संजय कुंभार, श्रीनिवास परीट, शाहिर सदाशिव निकम, विक्रम कामत, रावण समुद्रे, रवि भोसले, बंकट पुरी, सुधीर पाटील, बर्वे सचिन, सोहम पाटील, अशोक गरुड, अतुल माळी सहभागी झाले होते.
कामगार व कुटुंबियांचे काव्यसंमेलनात कोरोनावरील कविता, सामाजिक आशय मांडणाऱ्या, स्त्रियांच्या वेदना मांडणाऱ्या, राजकीय भाष्य करणाऱ्या, कष्टकरी समुहाचे नेतृत्व करणारी, तरूणांना दिशा देणारी, पर्यावरण आणि व्यसनावरील कविता व कौटुंबिक विषयावरील काव्यरचना अशा अनेक विषयांना हात घालत तीन तास हे काव्यसंमेलन रंगत गेले.
संमेलनाचे अध्यक्ष साहित्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त नागपूर येथील जेष्ठ कवी बळवंत भोयर हे होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून नांदेड येथील अधिव्याख्याती व मराठवाडयातील प्रसिध्द कवयित्री प्रा. संध्या रंगारी होत्या. तर कोल्हापूर गटाचे कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे व सांगली गटाचे कामगार कल्याण अधिकारी राजेंद्र निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त महेंद्र तायडे यांनी सर्वांना सदिच्छा दिल्या. तसेच पुणे विभागीय सहाय्यक कल्याण आयुक्त समाधान भोसले यांनी मार्गदर्शन केले. कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी कामगार कल्याण केंद्र संचालक संघसेन जगतकर, शाहिन चौगले, विजय खराडे, सुजाता बुधले यांनी योगदान दिले.