Kalyan : कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीत काल रात्री झालेल्या संतापजनक घटनेत सरकारी अधिकारी अखिलेश शुक्ला आणि त्यांच्या साथीदारांनी मराठी व्यक्ती अभिजित देशमुख यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यामुळे अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीत राहणाऱ्या अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता यांनी घराबाहेर देवपूजा करताना लावलेल्या धूपाचा त्रास वयोवृद्ध आई व तीन वर्षांच्या बाळाला होत असल्याची तक्रार वर्षा कळवीकट्टे यांनी केली होती. हा वाद मिटवण्यासाठी अभिजित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे संतापलेल्या अखिलेश शुक्ला यांनी काही बाहेरच्या लोकांना बोलावून देशमुख बंधूंवर हल्ला चढवला. (Kalyan)
हल्ल्यादरम्यान, शुक्ला यांनी “तुम्ही मासे खाणारे मराठी माणसं घाण, भिकारी आहात. तुमचे मराठीपण बाहेर काढतो,” असे अपमानजनक वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. यामुळे सोसायटीतील नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर अभिजित देशमुख यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून हल्लेखोर आणि शुक्ला यांच्या सरकारी नोकरीचीही चौकशी सुरू आहे. (Kalyan)
विजय कळवीकट्टे यांनी माध्यमांना सांगितले की, “शुक्ला यांनी अभिजित देशमुख यांच्या घरासमोर सायकल आपटली आणि सात-आठ जणांच्या मदतीने लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यांनी मला देखील ठार मारण्याची धमकी दिली.” या घटनेमुळे राज्यभरात मराठी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
हे ही वाचा :
सर्वात मोठी भरती : भारतीय स्टेट बँक अंतर्गत तब्बल 13,735 जागांसाठी मेगा भरती
जुन्नर बस स्थानकात पिकअप वाहनाचे धोकादायक स्टंट करणारा पोलिसांच्या ताब्यात
मोठी बातमी : प्रख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन
मोठी बातमी : 39 मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, वाचा यादी
धक्कादायक : शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना झोपवले जमिनीवर, नागरिकांचा संताप
परभणीतील हिंसाचारानंतर आंबेडकरवादी उच्च शिक्षित तरूणाचा पोलिस कोठडीत मृत्यू, सर्वत्र खळबळ
ब्रेकिंग : जळगाव येथे बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, २१ जखमी