नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई (Bhushan Gavai) यांची भारताचे 52वे सरन्यायाधीश (Chief Justice of India) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते 14 मे 2025 रोजी शपथ घेतील आणि 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत या पदावर कार्यरत राहतील. राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ देतील. सध्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर गवई यांना ही जबाबदारी सोपवण्यात येईल.
सर्वोच्च न्यायालयातील सध्याच्या न्यायमूर्तींमध्ये भूषण गवई ज्येष्ठ असून पुढचे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणारे गवई हे नागपूर बार असोसिएशनचे तिसरे सदस्य आहेत. याआधी न्या. मोहम्मद हिदायतुल्ला आणि शरद बोबडे हे सरन्यायाधीश झाले होते. (हेही वाचा – धक्कादायक : दोन मित्रांची एकाच झाडाच्या फांदीला गळफास घेत आत्महत्या)
कोण आहेत भूषण गवई ? | Bhushan Gavai
न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावती, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे वडील प्रभाकर गवई हे प्रसिद्ध वकील आणि आंबेडकरी चळवळीचे नेते होते. भूषण गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते, माजी आमदार, खासदास आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल रा. सु. गवई आणि कमलाताई गवई यांचे पुत्र आहेत. (हेही वाचा – ब्रेकिंग : ‘ईव्हीएम हॅक करून निकाल बदलता येतो’, अमेरिकेच्या गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड)
गवई यांनी आपल्या कायदेशीर कारकीर्दीची सुरुवात 1987 मध्ये नागपूर उच्च न्यायालयात वकिलीपासून केली. त्यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये यशस्वीपणे बाजू मांडली आणि 2003 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. (हेही वाचा – महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याला एका झाडाने रात्रीतून केले करोडपती)
2019 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली, जिथे त्यांनी सामाजिक न्याय, मानवी हक्क आणि संविधानाच्या मूलभूत तत्त्वांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये आपले योगदान दिले. अलिकडेच उत्तर प्रदेशातील आरोपींच्या घरांवरील बुलडोझर कारवाईच्या विरोधात सरकारला चांगलेच फटकारले होते. (हेही वाचा – बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाचे वेध ; वाचा काय आहेत नवीन अपडेट)