Monday, September 16, 2024
Homeजुन्नरJunnar : श्री शिवछत्रपती महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

Junnar : श्री शिवछत्रपती महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

Junnar, (आनंद कांबळे) : श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर वाणिज्य व संशोधन केंद्र विभागाअंतर्गत ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमारे, उपप्राचार्य डॉ. रविंद्र चौधरी, कॉमर्स विभाग प्रमुख डॉ सतिश जाधव, कला शाखाप्रमुख डॉ अभिजित पाटील , डॉ. पूनम माने आणि वाणिज्य शाखेतील सर्व सहकारी प्राध्यापक वृंद मोठया संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. वाघमारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना म्हणाले ‘आधुनिक गुरु मोबाईल याचा ज्ञान घेण्यासाठी आवश्य वापर करावा, परंतू वेळ हा अमूल्य असल्यामुळें वेळेचा सदपयोग करावा व आपले उज्वल भविष्य घडवावे’ तसेच यावेळी कला विभागप्रमख डॉ. अभिजित पाटील व वाणिज्य शाखा प्रमुख डॉ सतिश जाधव यांनी देखील विद्यार्थ्यांना अमूल्य असे मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. (Junnar)

जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे आणि अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. विलास कुलकर्णी यांचे देखील अमूल्य मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. हा दिवस विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला आणि शिक्षक-विद्यार्थी नात्यातील ऋणानुबंध अधिक दृढ झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रध्दा रेणुकदास, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. सारीका बनकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

मोठी बातमी : ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचे’ नाव राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाला

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले

“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी

संबंधित लेख

लोकप्रिय