जुन्नर / रविंद्र कोल्हे : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पोटच्या मुलाचा आईनेच परकरच्या नाडीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना नारायणगाव पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील येडगाव, भोरवाडी गावठाण शिवारात घडली. साधारण एक महिन्यांपूर्वी घडलेल्या या प्रकरणाचा छडा नारायणगाव पोलिसांनी मेडिकल दाखल्याचा आधार घेऊन मोठ्या शिताफीने लावला. या गुन्ह्यातील आरोपी विद्या सचिन कदम वय ३९ वर्षे १४ नंबर हिस नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
महिलेचा पती सचिन शंकर कदम (वय ४१, सुरक्षारक्षक, रा.ओव्हाळ वस्ती मज्जीद शेजारी, लोहगाव पुणे) यांनी नारायणगाव पोलिसांना दिली. फिर्यादी वरून नारायणगाव पोलिसांनी गुरुवार दिनांक १८.१८ वाजता. गुन्हा.र.नंबर २७/२०२२ भारतीय दंड विधान कलम ३०२,२०१ अन्वये दाखल करून आरोपी विद्या चव्हाण हिस अटक करण्यात आली आहे.
खाजगी कंपनीच्या संचालकाला १६२ कोटी रुपयांच्या बोगस देयकाप्रकरणी अटक
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, विद्या कदम हिचा प्रियकर दत्तात्रय गोविंद औटी (रा.इनाम मळा, बोरी बुद्रुक, ता.जुन्नर) याच्याबरोबर अनैतिक संबंध होते. या संबंधात मुलगा राज (वय १३) अडसर ठरत होता. त्यामुळे विद्या हिने दिनांक २० जानेवारी गुरुवार दिनांक २०२२ रोजी मुलगा झोपेतच असतांना परकरच्या नाडीने गळा आवळून मुलाचा खून केला. त्यानंतर त्याच्या छातीवर प्लास्टिक”च्या झाडूने मारहाणं केली. यानंतर त्याची हालचाल होत नाही हे पाहून त्यास नारायणगाव येथे एका खाजगी दवाखान्यात दाखल केले. मात्र परिस्थिती गंभीर असल्याने खाजगी डॉक्टरांनी रुग्णाला पुणे येथे पुढील उपचारासाठी हलविण्याचा सल्ला दिला. उपचारादरम्यान २७ जानेवारी रोजी रात्री १२ च्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याबाबत विद्या कदम हिने ससून रुग्णालयात खोटी माहिती सांगून घडलेली माहिती लपवली व मुलाच्या अंत्यविधीही उरकून टाकला. याबाबतची मेडिकल कागदपत्र पोलिस स्टेशनला प्राप्त झाल्याने पोलिसांनी याचा कसून तपास केला. मयताच्या तपास करीत असतांना पोलिसांना हा घातपात असल्याचा संशय आला. त्यांनी आरोपी विद्या कदम हिची कसून चौकशी केली. तेव्हा पोलिस खाक्यापुढेही आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत आहे. हे पोलिसांच्या नजरेतून सुटले नाही. आता मात्र पोलिसांचा संशय अधिक बळावला मात्र ठोस पुरावा हाती येईना. अखेर तो दिवस उजाडला नारायणगाव पोलिसांच्या तपासला यश आले ते आरोपीच्या बोलण्यातील विसंगती मुळे. संशयाची सुई पुन्हा आरोपीवर केंद्रित झाली. आणि पोलिसांच्या अचूक तपासामुळे आरोपीने मुलगा राज सचिन कदम वय १३ याचा झोपेत असतांनाच परकरच्या नाडीने गळा आवळून खून केला, अशी कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला.
ब्रेकिंग : २००८ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी ७८ पैकी ३८ जणांना फाशी, तर ११ जणांना जन्मठेप
या कारवाईत पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, यांच्या सूचनेनुसार नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील धनवे, सहायक फौजदार केंगले, ढमाले, पोलिस हवालदार टाव्हरे, पोलिस जवान नवीन आरगडे, सचिन कोबल, शाम जायभावे, शैलेश वाघमारे यांनी तपास केला.
देशातील सर्वात तरूण महापौर करणार आमदारासोबत लग्नं