पिंपळवंडी : राष्ट्रीय राज पंचायत दिनाच्या (National Raj Panchayat Day) निमित्ताने पिंपळवंडी ग्रामपंचायतीच्या वतीने चाळकवाडी येथील शिवांजली विद्या निकेतनमध्ये शनिवारी ( दि.२३) बालग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
शासनाच्या आदेशानुसार पुणे जिल्हा परिषदेच्या (Pune Zilla Parishad) वतीने जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे यांनी राष्ट्रीय राज पंचायत दिनानिमित्त बालसभा व बालपंचायतीचे आयोजन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पिंपळवंडी ग्रामपंचायतीच्या वतीने चाळकवाडी येथील शिवांजली विद्या निकेतनमध्ये या बालसभेचे आयोजन करण्यात आले होते.
जुन्नर : कातकरी समाज जगतोय अद्यापही पारतंत्र्यात, नदीकिनारी धोकादायक वास्तव्य
जुन्नर : मांदारणेच्या जिल्हा परिषद शाळेत शाळापूर्व तयारी अभियान मेळावा संपन्न
या कार्यक्रमाचे उदघाटन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पुजनाने करण्यात आले. यावेळी बालकांच्या अडीअडचणी समाजावून घेण्यात आल्या व त्यावर योग्य त्या उपायोजना करण्यात येणार असल्याचे सरपंच विकास भांगरे यांनी सांगितले.
या प्रसंगी सरपंच विकास भांगरे, उपसरपंच प्रदीप चाळक, ग्रामविकास अधिकारी गणेश थोरात, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल रासकर, योगेश वामन, सतिष काकडे, सत्यवान काकडे, सदस्या आरती वायकर, रंजना वाकचौरे, मुख्याध्यापक बी. आर. चासकर, शिवांजली प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वैशाली चासकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली शिंदे, सहशिक्षिका स्वाती गायकवाड, जेष्ठ शिक्षक बाबासाहेब जाधव, सुनंदा गोपाळे, विष्णू बोरसे, बंडू सदामते, अशोक कु-हाडे, प्रशांत शेटे, ग्रामपंचायत कर्मचारी सत्यवान अभंग, सदानंद घोलप, आशिष घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन बाबासाहेब जाधव यांनी केले तर आभार अशोक कु-हाडे यांनी मानले.
बॉम्बे उच्च न्यायालयात 25 रिक्त जागांसाठी भरती, 50,000 रूपये पेक्षा जास्त पगाराची नोकरी !
कोकण कृषी विद्यापीठात तब्बल 30,000 रूपये पगाराची नोकरी, 2 दिवस शिल्लक