Saturday, October 12, 2024
Homeराज्यपंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत, "या" पहिल्या पुरस्काराने करण्यात येणार सन्मानित

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत, “या” पहिल्या पुरस्काराने करण्यात येणार सन्मानित

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येणार आहेत. गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणारा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान केला जाणार आहे. 

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे नुकतंच फेब्रुवारी महिन्यात निधन झालं. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ यंदाच्या वर्षापासून लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा मंगेशकर कुटुंबीयांनी केली असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. हा पुरस्कार जाहीर झालेले ते पहिले मानकरी आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक

सायनच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडणार्‍या या सोहळ्यामध्ये संपूर्ण मंगेशकर कुटुंब हजर राहणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा पार पडले असं सांगितलं जातंय. तसंच या सोहळ्यास राज ठाकरेही उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यंदाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद सुश्री उषाताई मंगेशकर यांच्याकडे असणार आहे. तसेच यंदा नरेंद्र मोदींना लता मंगेशकर पुरस्कार तर संगीत क्षेत्रासाठीतील मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार गायक राहुल देशपांडे यांना, चित्रपट सेवेसाठीचा मास्टर दीनानाथ विशेष पुरस्कार आशा पारेख आणि जॅकी श्रॉफ यांना, मास्टर दीनानाथ आनंदमयी हा समाजसेवेसाठीचा पुरस्कार मुंबईचे डबेवाले (नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्ट) आणि सर्वोत्कृष्ट नाटकासाठी पुरस्कार संज्या छाया नाटकाला जाहीर करण्यात आला आहे.

पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती, आजच अर्ज करा!

सुवर्णसंधी ! मुंबई उच्च न्यायालयात 4 थी पास साठी तब्बल 47,000 रूपये पगाराची नोकरी

संबंधित लेख

लोकप्रिय