जुन्नर : स्वराज्य प्राप्तीसाठी 1600 महादेव कोळी विरांनी केलेल्या बलिदनाच्या प्रित्यर्थ महादेव कोळी चौथरा अभिवादन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळी 7:30 वाजता किल्ले शिवनेरी वरील महादेव कोळी चौथरास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सकाळी 10:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळा ते महादेव कोळी स्मृती फलक अशी मशाल रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर अभिवादन सभेत शाहीर संदीप गवारी यांनी पोवाडा सादर करत कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी बोलताना जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके म्हणाले, महादेव कोळी चौथरा अभिवादन वादन कार्यक्रम हा तालुक्यात एकच होईल यासाठी सर्व संघटनांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम एकाच दिवशी करावा, असे आवाहन केले. तो समन्वय समितीच्या माध्यमातूनच घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
माजी आमदार शरद सोनवणे यांनी सांगितले की राज्य सरकारच्या माध्यमातून पाठपुरावा करून एक तारीख निश्चित करून महाराष्ट्रातील मंत्रिगण अभिवादनाच्या कार्यक्रमासाठी आणण्याचा आपला पुढच्या वर्षापासून प्रयोजन आहेे. यावेळी शिवनेर भूषण विनायक खोत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
तसेच जुन्नर तालुक्याच्या वतीने आदिवासी महामंडळाचे संचालक मधुकर काठे यांनी अभिवादन मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादाभाऊ बगाड होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन लांडे व बाळासाहेब लांघी यांनी केले. प्रस्ताविक आदिवासी नॅशनल पेपर फेडरेशन मारुती वायळ यांनी केले व आभार वसुबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय गवारी यांनी मानले.
मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, अहमदनगर या ठिकाणावरून नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समन्वय समितीचे अध्यक्ष तुळशीराम भोईर, कार्याध्यक्ष काळू शेळकंदे, रवींद्र तळपे, सुनील विरनक, भरत दिघे, बाळासाहेब गोडे, विश्वास भालिंगे, नामदेव मुंढे, सुभाष मोहरे, प्रा. संजय मेमाणे यांनी प्रयत्न केले.