जुन्नर : आज नारायणगाव डेपोच्या जुन्नर – देवळे या बस ला मोरेवस्ती (खटकाळे) येथे अपघात झाला. परंतु चालकाच्या प्रसंगावधाननाने मोठा अनर्थ टळला. काळ आला होता. पण वेळ आली नव्हती याची प्रचिती बसमधील प्रवाश्यांनी अनुभवली. Junnar
नारायणगाव आगाराची बस क्रमांक एमएच.०६ एस.८२०१ जुन्नर येथून दुपारी तीन वाजेच्या सुमारास देवळे फेरीसाठी चालक घेऊन जात होते. मोरेवस्ती येथे आली असता बस चा ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. पुढे मोठी दरी होती. प्रसंगावधान दाखवित बस चालकाने बस रस्त्याच्या खाली उतरवली. Junnar
यामुळे बसमधील 50 पेक्षा जास्त प्रवाश्यांचा जीव वाचला. प्रवाश्यांचा जीव वाचविणारा चालक प्रवाश्यांसाठी देवदूत ठरला आहे. काळ आला होता. पण वेळ आली नव्हती याची प्रचिती बसमधील प्रवाश्यांनी अनुभवली.
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हे ही वाचा :
महत्वाची बातमी : यापुढे शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक, ‘असा’ नावाचा असेल अनुक्रम
मोठी बातमी : देशात CAA’नागरिकत्व सुधारणा कायदा’ लागू
इलेक्टोरल बाँड्सची माहिती उद्यापर्यंत देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला आदेश
आमदार निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशावर शरद पवार यांचे मोठे विधान
मोठी बातमी : आणखी एक बडा नेता शिंदे गटात, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात वृद्ध महिलेचा मृत्यू