जुन्नर (आनंद कांबळे) : जुन्नर (Junnar)तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी १ कोटी ४४ लक्ष रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन तालुक्याचे आमदार अतुल बेनके हस्ते आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
जुन्नर शहरात तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अभ्यासिका केंद्र इमारत हि गरजेची होती. तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने पुणे मुंबई, नाशिक, औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरात जावे लागते.
जुन्नर तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शहरातील राहण्याचा खर्च पेलवत नाही. जुन्नर तालुक्याच्या मध्यवर्ती भागात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका केंद्र सुरू करावी म्हणून विद्यार्थी वर्गाकडून वारंवार मागणी केली जात होती आणि विद्यार्थ्यांचीही मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती.
परंतु आता जुन्नर शहरात अभ्यासिका केंद्र उभारण्यात आल्यामुळे अभ्यासासाठी विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे. या अभ्यासिकेच्या माध्यमातून भविष्यातील अनेक अधिकारी याठिकाणी घडतील असा विश्वास याप्रसंगी आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केला आणि उपस्थित विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी समवेत जुन्नर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्याम पांडे, सुनीलजी मेहेर, भाऊ कुंभार, फिरोज भाई पठाण, भूषण ताथेड, मयूर महाबरे, शाम खोत, बाळासाहेब सदाकाळ, उज्वला शेवाळे, वैष्णवी चतुर, कविता छाजेड, हाजरा इनामदार, वैभव मलठणकर, ऋषी दुबे, मंदार ढोबळे, विनायक कर्पे, अंबर परदेशी, इसाक कागदी, गणेश महाबरे, आनंद कांबळे, नितीन गाजरे, देवराम मेहेर, सईद पठाण, नितीन ससाणे, अमोल गायकवाड, मुख्याधिकारी संदीप भोळे, नायब तहसिलदार सारिका रासकर, प्रसन्न केदारी, दीपक मडके, कुलकर्णी साहेब यांसह इतर मान्यवर आणि शहरातील नागरिक उपस्थित होते.
Junnar


हेही वाचा :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
राज्यात आज किंवा उद्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता
बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींना अटक, तर फरार आरोपीचा शोध सुरू
आनंदाची बातमी : होमगार्डसाठी राज्य सरकारने दिले दसऱ्याचे मोठे गिफ्ट
महायुती सरकार : महिलांसाठी महायुती सरकारची मोठी घोषणा
दसऱ्याच्या आधीच सोन्याच्या दरात घसरण, वाचा आजचे दर
नाशिकमध्ये प्रशिक्षणा दरम्यान दोन अग्निवीरांचा मृत्यू
मोठी बातमी : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन
युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? वाचा सविस्तर!
सोयाबीनसाठी यंदाचा हमीभाव गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक!
समाज कल्याण आयुक्तालय, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 219 जागांसाठी भरती