पिंपरी चिंचवड – अनंतकोटी श्री स्वामी समर्थ सेवामार्ग ट्रस्ट,सफ्रॉन एज्युकेशनल आणि मेडिकल फौंडेशन यांचे अधिकृत स्टडी सेंटर,समर्थ सोशल फौंडेशन कोल्हापूर अंतर्गत व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती मार्गदर्शन केंद्र आणि सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ नागपूर यांचे पुणे जिल्हा तथा पिंपरी चिंचवड शहर कार्यालयाचे उदघाटन गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर माजी नगरसेवक तथा श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री नारायण बहिरवाडे यांच्या हस्ते शिवतेजनगर चिंचवड येथे करण्यात आले. (PCMC)
या प्रसंगी श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हरि नारायण शेळके, प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष राजू गुणवंत , सेवेकरी प्रमुख क्षमा काळे,सामाजिक कार्यकर्ते गंगाधर मांडगे, राजेंद्र चकटे, शेळके परिवार व थोरात परिवार, सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमित कोकणे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष भगवान वायकर व वरील चारही कार्यालयाचे पुणे शाखेचे संस्थापक किशोर थोरात व महेंद्र शेळके उपस्थित होते. )PCMC)
सफ्रॉन एज्युकेशनल आणि मेडिकल फौंडेशन यांचे अधिकृत स्टडी सेंटर अंतर्गत Diploma, BASM, MD, Phd in Naturopathy असे डिस्टन्स लर्निंग कोर्स करण्याची संधी असलेले 10 वी, 12 वी, डाक्टर्स, मेडिकल अनुषंगाने कार्यरत असणाऱ्या प्रत्येकाला Naturopathy डॉक्टर बनण्याची उपलब्ध करण्यात आलेली आहे.
या कोर्सेस मधून शिक्षण घेऊन महिला, अर्धवट शिक्षण राहिलेले नागरीक यांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी कमी खर्चात शिक्षण घेऊन आर्थिक सक्षम व्हावे म्हणून या स्टडी सेंटर ची सुरुवात करण्यात आलेली आहे असे सेंटर चे संचालक किशोर थोरात व महेंद्र शेळके यांनी सांगितले. (PCMC)
समर्थ सोशल फौंडेशन कोल्हापूर अंतर्गत नशामुक्ती व मधुमेह मुक्ती मार्गदर्शन केंद्र स्थापन करून मधुमेहमुक्त भारत अभियान व व्यसनमुक्ती अभियान राबण्यास आयुर्वेदिक औषधे स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
भारत ही मधुमेहाची राजधानी समजली जाते म्हणून अशा आपल्या भारत देशाला मधुमेह मुक्त करण्यासाठी राज्यस्तरीय मधुमेहमुक्ती व व्यसनमुक्ती दूत पुरस्कार प्राप्त किशोर थोरात व महेंद्र शेळके हे नेहमीच प्रयत्नशील असणार आहेत असे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
सामाजिक कल्याण एंव मानव संरक्षण संघ या मानवाधिकार संघटनेच्या मुख्यालय नागपूर अंतर्गत मानवाधिकार,सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी मदत कार्य करण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहर कार्यालय येथे चालू करण्यात आलेले आहे. सदर कार्यालयात पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात व पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष महेंद्र शेळके समस्या सोडवण्यासाठी उपलब्ध असणार आहेत.
कावेरी हर्बल आयुर्वेदिक ३२ पेक्षा जास्त आजारावर स्वस्त औषधे रोगमुक्त अभियान राबविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
तर स्वामी समर्थ सेवेच्या माध्यमातून गेली कित्येक वर्षे सेववकर्यांच्या समस्या निवारण करणारे तसेच ३२ वर्षांचा प्रगल्भ असा स्वामी समर्थ सेवेचा अनुभव असलेले अध्यात्मिक गुरू श्री संजय तळोले यांच्या मार्गदर्शनाखाली अनंतकोटी श्री स्वामी समर्थ सेवामार्ग ट्रस्ट ची स्थापना करून कार्यालय सुरू केले असून श्री संजय तळोले हे समस्या निवारण आठी महिन्यातून एक दिवस येथे उपलब्ध असणार आहेत.
वरील सामाजिक, अध्यात्मिक, आरोग्य व शैक्षणिक कार्य एकाच ठिकाणी होणार असून पुणे येथील गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
अशा या विविध संस्था एकाच छताखाली असल्याने नागरिकांना मोठा फायदा होणार असून पुण्यमधील हा असा पहिलाच उपक्रम राबविण्यात येत आहे.
वरील संस्थांचे एकाच ठिकाणी कार्यालय सुरू करून सुविधा उपलब्ध करून दिल्याने समर्थ सोशल फौंडेशन कोल्हापूर या संस्थेचे अध्यक्ष सादिक शेख, सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे,राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार व पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांनी फोन वरून शुभेच्छा दिल्या तर सफ्रॉन फौंडेशन चे संचालक भाव्या पटेल, अनंत कोटी श्री स्वामी समर्थ सेवामार्ग ट्रस्ट चे संस्थापक तळोले सर आणि कावेरी हर्बल चे डॉ रासेकर यांनीही कौतून केले व शुभेच्छा दिल्या.
या संस्थांबरोबर कार्य करून आपण या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी किंवा सेवांचा लाभ घेण्यासाठी किशोर थोरात 8796824682 व महेंद्र शेळके 9657714171 यांना संपर्क करू शकता.
---Advertisement---
---Advertisement---
PCMC : सामाजिक, शैक्षणिक, आयुर्वेदिक व आध्यात्मिक संस्थेचे माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांच्या हस्ते उदघाटन
---Advertisement---
- Advertisement -