जुन्नर : अंजनावळे येथे आदिवासी मावळ महोत्सव समितीच्या वतीने भव्य आदिवासी मावळ महोत्सवाचे आयोजन दिनांक 6 मे ते 7 मे 2023 रोजी करण्यात आले आहे.
पहिल्या दिवशी आदिवासी क्रांतिकारक व महापुरुषांचे प्रतिमापूजन व कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहेत. तसेच मोफत आरोग्य तपासणी, मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, व्याख्यान व महाराष्ट्राची लोकगाणी असे स्वरूप असणार आहे. तर दुसऱ्या दिवशी नंदी नृत्य, महापुरुषांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक, कुस्त्यांचा जंगी आखाडा तसेच मंगला बनसोडे सह नितीन बनसोड करवंडीकर यांचा लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.
समस्त ग्रामस्थ मंडळी अंजनावळे, श्री हनुमान व श्री भैरवनाथ तरूण मंडळ, सह्याद्री म्युझिकल बॅंजो ग्रुप व सर्व क्रिकेट टीम यांनी यांचे संयोजन केले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.