Home जुन्नर Junnar : ६.५ लाखांचे अॅल्युमिनियम तारा चोरणाऱ्या आरोपींना अटक, जुन्नर पोलीसांची मोठी...

Junnar : ६.५ लाखांचे अॅल्युमिनियम तारा चोरणाऱ्या आरोपींना अटक, जुन्नर पोलीसांची मोठी कारवाई

६.५ लाखांचे अॅल्युमिनियम तारा चोरणाऱ्या आरोपींना अटक, जुन्नर पोलीसांची मोठी कारवाई Junnar Accused who stole aluminum wire worth 6.5 lakhs arrested

Junnar (रफिक शेख) : महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या ४०० केव्ही अतिउच्च दाबाच्या वीज वाहिन्यांवरील जुन्नर पोलीस स्टेशन हद्दित नेतवड ते नाणेघाट दरम्यान अॅल्युमिनियमच्या तारांची चोरी करणाऱ्या पाच सराईत आरोपींना जुन्नर पोलिसांनी अटक करून ६,५०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तक्रारदार सुरेश प्रसाद यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण विभागाच्या वतीने जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली होती. गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने काम सुरू केले.

सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि पेट्रोलिंगच्या आधारे चाकण व आळंदी परिसरातून अविनाश लक्ष्मण कोळेकर (चाकण), माधव रोहिदास गिते (चाकण), आकाश श्रीराम आढे (चाकण), शिवशंकर मारूती हळदेकर (चाकण), चंद्रशेखर लौटुराम हरिजन (आळंदी फाटा) या पाच आरोपींना अटक करण्यात आली.

तपासादरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला अशोक लेलंड टेम्पो (एमएच १४ जीयू ०९६८) आणि बजाज पल्सर मोटरसायकल (एमएच १४ एलआर ९९४७) जप्त केली. तसेच चोरीला गेलेल्या २ टन अॅल्युमिनियम ताराही हस्तगत करण्यात आल्या, ज्यांची अंदाजे किंमत ६.५ लाख रुपये आहे.

ही महत्त्वाची कारवाई पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर, पोलीस निरीक्षक किरण अवचर, आणि सायबर पोलीस स्टेशनच्या पथकाने मोलाचे योगदान दिले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे आणि पोलीस हवालदार गणेश शिंदे करीत आहेत.

Junnar

हे ही वाचा :

अमेरिकेतील भारतीयांसाठी वाईट बातमी, डोनाल्ड ट्रम्पने यांनी केली मोठा घोषणा

ॲड. राहुल नार्वेकर यांची १५ व्या विधानसभेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड

मोठी बातमी : कुर्ल्यात बेस्ट बसचा भीषण अपघात, 6 ठार, 49 जखमी ; धक्कादायक व्हिडिओ समोर

वडापाव विक्रेत्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास ; आमदार विनोद निकोले यांची प्रेरणादायक कहाणी

लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी होणार ? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती

महिलांना केंद्र सरकारकडून मिळणार 7 हजार रूपये, काय अट आहे वाचा !

पिंपरी चिंचवडमध्ये भंगार गोदामाला भीषण आग, रहिवासी भागात धुराचे लोट

Jio च्या ग्राहकांसाठी खूशखबर : 479 रुपयांत 84 दिवसांचा नवा प्लॅन ; वाचा काय आहे ऑफर

Exit mobile version