जुन्नर : जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथील रहिवासी अक्षय बोऱ्हाडे याने जुन्या बातमीच्या रागातून पत्रकार संदिप उत्तर्डे यांना दुरध्वनीवरून शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना घडली आहे. याबाबत उत्तर्डे यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. (Junnar)
अक्षय बोऱ्हाडे यांनी संदिप उत्तर्डे यांना दि. १७ डिसेंबर २०२४ रोजी, फोन करून जुन्या बातमीवरून वाद घातला. फोनद्वारे शिवीगाळ करत त्यांनी दोन-तीन दिवसांत “मी काय करतो ते बघ” असे बोलत अप्रत्यक्षरीत्या घातपात करण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे संदिप उत्तर्डे यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ जुन्नर तालुक्यातील पत्रकारांनी एकत्र येत घटनेचा निषेध केला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा ते पोलिस स्टेशन पर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या प्रकरणामुळे पत्रकारांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जुन्या बातम्यांच्या आधारे पत्रकारांना धमकावले जाणे, हे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धोका असल्याचे मत पत्रकारांनी व्यक्त केले आहे. (Junnar)
Junnar
हे ही वाचा :
सर्वात मोठी भरती : भारतीय स्टेट बँक अंतर्गत तब्बल 13,735 जागांसाठी मेगा भरती
जुन्नर बस स्थानकात पिकअप वाहनाचे धोकादायक स्टंट करणारा पोलिसांच्या ताब्यात
मोठी बातमी : प्रख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन
मोठी बातमी : 39 मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, वाचा यादी
धक्कादायक : शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना झोपवले जमिनीवर, नागरिकांचा संताप
परभणीतील हिंसाचारानंतर आंबेडकरवादी उच्च शिक्षित तरूणाचा पोलिस कोठडीत मृत्यू, सर्वत्र खळबळ
ब्रेकिंग : जळगाव येथे बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, २१ जखमी