Tuesday, September 17, 2024
Homeताज्या बातम्याWipro : आयटी क्षेत्रात नोकरीची मिळणार संधी; विप्रो देणार 12 हजार नोकऱ्या

Wipro : आयटी क्षेत्रात नोकरीची मिळणार संधी; विप्रो देणार 12 हजार नोकऱ्या

Wipro Recruitment 2024 : आयटी क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सुप्रसिद्ध IT कंपनी Wipro ने 2025 या आर्थिक वर्षासाठी मेगा प्लॅन आखला आहे. या प्लॅननुसार कंपनी 10,000 ते 12,000 नवीन लोकांची नियुक्ती करणार आहे. Wipro Job

यामध्ये कॅम्पसच्या माध्यमातून नियुक्ती आणि कॅम्पस शिवाय नियुक्त्या होणार आहेत. गेल्या दोन आर्थिक वर्षांत Wipro कंपनीने कर्मचाऱ्यांच्या संख्येत सातत्याने कपात केली होती. मात्र आता अचानक 2025 च्या आर्थिक वर्षात Wipro 10 ते 12 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे. त्यामुळे IT सेक्टर मध्ये काम करणाऱ्या तरुणांसाठी हि मोठी आनंदाची बाब समजली जात आहे.

30 जून 2024 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत, विप्रोने 3,000 हून अधिक नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. हेडकाउंटमध्ये सलग सहा तिमाहीत घट झाल्यानंतर या तिमाहीत 337 कर्मचाऱ्यांची वाढ नोंदवली गेली. कंपनीने पुढील आर्थिक वर्षासाठी सुद्धा अशाच प्रकारे तब्बल 10,000 ते 12,000 नोकर भरतीची योजना आखली आहे. आम्ही पुन्हा एकदा नोकरभरती करणार आहोत असं मुख्य मानव संसाधन अधिकारी सौरभ गोविल यांनी 19 जुलै रोजी कंपनीच्या Q1 कमाई परिषदेदरम्यान सांगितले.

ते पुढे म्हणाले, विप्रो आर्थिक वर्ष 2025 मध्ये दिलेल्या सर्व जॉब ऑफर पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत आहे. आम्ही काही संस्थांसोबत आमचे संबंध आणि भागीदारी मजबूत केली आहे. त्यामुळे आम्ही या वर्षी कॅम्पसमध्ये आणि कॅम्पसबाहेर भरती करू. पुढच्या वर्षीही तितक्याच लोकांना नोकरी देण्याची आमची योजना आहे. आमचा युटिलायझेशन रेशो सर्वोच्च शिखरावर असून त्यामुळे आमच्या पुरवठा साखळीवर लक्ष केंद्रित करण्याची ही योग्य वेळ आहे; असे गोविल यांनी सांगितलं.

Wipro

google news gif

हेही वाचा :

Indian Navy : भारतीय नौदलात 10वी, 12वी, पदवी, ITI उत्तीर्णांसाठी भरती

मोठी भरती : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1040 जागांसाठी भरती

मोठी बातमी : शिक्षकांच्या 268 जागांसाठी भरती प्रक्रिया

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 112 जागांसाठी भरती

Indian Army : भारतीय सैन्य दल अंतर्गत खेळाडूंसाठी भरती; पात्रता 10वी

EPFO : कर्मचारी भविष्य निधी संगठन मार्फत विविध पदांसाठी भरती

GAD : सामान्य प्रशासन विभाग, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत भरती

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

वनशास्र महाविद्यालय, दापोली अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत अंतर्गत विविध पदांची भरती

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात ‘कॉन्स्टेबल’ पदांसाठी भरती, पात्रता – 10वी, ITI

संबंधित लेख

लोकप्रिय