पाऊल खुणा
पाऊल खुणा तुझ्या
बोलावितात नेहमी मायने
भेगाळलेल्या पायावर सदा
हात फिरवितो आपुलकीने.
घरट्याकडे पुन्हा येतो रे
तहानेने व्याकुळलेला बाप
लेकरांना तुटकाभर घास
भरवायला आतुरली रे माय.
आटलेल्या नदीतल्या माशाने
आसवांनी पाणी गाळले
सुकलेल्या मातीच्या रानात
थेंबा थेंबाचे तळे साचले.
करपलेल्या शेती काठी
बाप पाहतो तुझी वाट रे
जमिनीवरच्या पाऊलखुणा
पाण्याने बरसावे मोत्याचे दाणं रे
कधी बुजतील रक्ताळलेल्या
जमिनीवरच्या पाऊलखुणा
कर्जापायी लुटले बापाला
सरकार या सावकारणही हाना
कवी – योगेश बोऱ्हाडे
मु.पो. देवळे ता. जुन्नर जि. पुणे.
9834516144