Sunday, December 22, 2024
Homeजिल्हापुणे : शिशू वर्गातील मुलांचे शिक्षण सुरू करण्याचे निर्देश, तर उद्यान आणि...

पुणे : शिशू वर्गातील मुलांचे शिक्षण सुरू करण्याचे निर्देश, तर उद्यान आणि दुकानांच्या वेळा पूर्वीप्रमाणे..

पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत जम्बो कोविड रुग्णालय बंद करण्याचा निर्णय

पुणे : जिल्ह्यातील कोविड संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात येत असल्याने शिशू वर्गातील मुलांचे शिक्षण सुरू करण्यात यावे आणि जम्बो कोविड रुग्णालय येत्या २८ फेब्रुवारीनंतर बंद करण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख उपस्थित होते.

 विशेष लेख : अमृतलाही पैजा जिंकायला लावणारी मराठी भाषा!

पवार म्हणाले, जम्बो कोविड रुग्णालय बंद केल्यानंतर तेथील परिसर पूर्ववत करण्यात यावा. रुग्णालयातील साहित्य पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रात उपयोगात आणले जावे. कोविड संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार नागरिकांनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. उद्यान आणि दुकानांच्या वेळा पूर्वीप्रमाणे करण्यात याव्या. ग्रामीण भागात ६० वर्षावरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना वर्धक मात्रा देण्याचे प्रमाण वाढवावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

जुन्नर : रोजगार मिळाला आता बेरोजगार भत्त्यासाठी लढा देणार, निमगिरीतील महिलांचा मजूरांचा निर्धार !

इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक मध्ये विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !


संबंधित लेख

लोकप्रिय