पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान येत्या 10 जूनला होत आहे. अलंकापुरीत नगरपरिषदेने जलपर्णी काढायला सुरूवात केली आहे. मात्र, पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड हद्दीतून येणाऱ्या केमिकलयुक्त पाण्याने नदी फेसाळून गेली आहे.
आळंदी येथील जेष्ठ नागरिक शामकांत भवरिया यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तळवडे, पिंपरी चिंचवड परिक्षेत्रात कोणते उद्योग केमिकलयुक्त पाणी सोडत आहेत, याची तपासणी करावी. केमिकल, क्षार आदी घटक वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट कार्यान्वित नसल्यामुळे नदीत सोडले जात आहेत. आळंदी नगरपरिषद व पिंपरी चिंचवड मनपा प्रशासनाने याबाबत कडक कारवाई केली पाहिजे, असे भवरिया म्हणाले.
तळवडे, चिखली, मोशी येथून जास्त प्रदूषण
नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी तळवडे, चिखली, मोशी परिसरातील लघु, मध्यम उद्योग व भंगार व्यावसायिक केमिकलचे विविध कंपन्यांकडून भंगारात मोठे ड्रम व इतर केमिकल प्रक्रियेतील दूषित पाणी इंद्रायणीत सोडत आहेत. पाणी फेसाळले असून पाणी तोंडात घेेण्यायोग्य राहिले नाही. वारकरी व सर्व आळंदीवासीयांना हा त्रास सहन होत असताना कोणी दखल घेत नसल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा :
महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर
महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात
डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची व्याप्ती वाढविली