महाराष्ट्राची अस्मिता बैलगाडा शर्यत झाली आता ‘ग्लोबल’
दुसऱ्या दिवशी सुमारे १५ हजार बैलगाडा प्रेमींची हजेरी
पिंपरी चिंचवड : भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आता ‘लोकल टू ग्लोबल’ असा प्रवास करताना दिसत आहे. महाराष्ट्राचा हा रांगडा खेळ पाहण्यासाठी विदेशी प्रेक्षकांनी हजेरी लावली. नेदरलँडमधील तीन प्रेक्षकांनी घाटात उपस्थित राहून बैलागाडा शर्यतींचा थरार अनुभवला.
भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आणि माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव यांच्या नियोजनातून भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत टाळगाव चिखली येथील रामायण मैदानावर सुरू आहे. या शर्यतींचे संयोजन जय हनुमान बैलगाडा मंडळ, राहुलदादा जाधव बैलगाडा मंडळाने केले आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी शनिवार असल्यामुळे बैलगाडा शौकींनांसह सर्वसामान्य नागरिकांनी रामायण मैदानावर मोठी गर्दी केली होती.
बृहन्मुंबई पोलिस विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 7 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
10 पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! पोस्ट विभाग अंतर्गत मुंबई येथे विविध पदांसाठी भरती
चाकण औद्योगिक पट्टयातील जीकेएन एरोस्पेस कंपनीचे संचालक असलेली तीन विदेशी नागरिक बैलगाडा शर्यतीला उपस्थित राहिले. मार्टिन दुर्विले, जोस्ट दुर्विले आणि युस्ट कम्पहुइस अशी तिघांची नावे आहेत. भारतीय संस्कृतीप्रमाणे महाराष्ट्रीय फेटा बांधून स्वागत करण्यात आहे. पाहुण्यांना अगदी वाजत-गाजत घाटात आणण्यात आले. उपस्थित श्रोत्यांनी जल्लोष करीत विदेशी पाहुण्यांचे स्वागत केले, अशी माहिती जय हनुमान बैलगाडा मंडळ व उत्सव समितीचे अध्यक्ष हनुमंत जाधव यांनी दिली.
मार्टिन दुर्विले म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारी बैलगाडा शर्यत मी प्रथमच अनुभवत आहे. महाराष्ट्रातील नागरिकांनी आमचा सन्मान केला. या सन्मानाने आम्ही भारावून गेलो. इथली संस्कृती आम्हाला भावते. बैलांप्रति इथल्या लोकांना असलेला जिव्हाळा कौतुकास्पद आहे.
विशेष लेख : मासिक पाळी – अपवित्र आहे ? चला तर समजून घेऊ
बैलगाडा शौकिनांसाठी दर्जेदार मेजवानी
ग्रामीण संस्कृतीला साजेसी मेजवानी असल्यामुळे बैलगाडा शौकीनांनी समाधान व्यक्त केले. सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दिवसभर स्पर्धा होणार असल्यामुळे रामायण मैदानावर जेवणाची खास व्यवस्था केली आहे. शनिवारी शौकीनांना जेवनासह बुंदी आणि मठ्ठ्यावर ताव मारला. विशेष म्हणजे, दुपारी तीन वाजता घाटात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना कलिंगडाचा मोफत आस्वाद घेता आला. उन्हाची तीव्रता जाणवू नये, यासाठी प्रेक्षक गॅलरीमध्ये गारवा निर्माण करणारे शॉवर बसवले आहेत. अस्सल ग्रामीण बाज असलेली बैलगाडा शर्यत अत्यंत दमदार आयोजन केल्यामुळे बैलगाडा शर्यतप्रेमींकडून समाधान व्यक्त होत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
राहुल जाधव,
माजी महापौर, पिंपरी-चिंचवड महापालिका.
संपर्क: +91 96654 63636
संपादन – क्रांतिकुमार कडुलकर
विशेष : भारतात आकाशातून पक्षी पडतायत पण का? वाचा !
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती, 13 जून 2022 शेवटची तारीख
“या” पुरूषांकडे महिला अधिक होतात आकर्षक, पहा सवयी !