Saturday, April 13, 2024
Homeताज्या बातम्याभारताची हुकूमशाहीकडे वाटचाल ? प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीच्या व्हिडिओने सर्वत्र खळबळ

भारताची हुकूमशाहीकडे वाटचाल ? प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीच्या व्हिडिओने सर्वत्र खळबळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी नेहमीच आपल्या व्हिडिओंमुळे चर्चेत असतो. नुकत्याच त्याने टाकलेल्या एका व्हिडिओने देशभरात खळबळ उडाली आहे. ज्या व्हिडिओ मध्ये त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. Is India becoming a DICTATORSHIP? Dhruv Rathee असे त्या व्हिडिओचे नाव आहे. ध्रुव राठीचा हा व्हिडिओ सर्वच सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे, तसेच Dhruv Rathee देखील सोशल मीडिया एक्स (X) वर ट्रेन्ड होत आहे.

युट्युबर ध्रुव राठीने भारत हा हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे का असा प्रश्न विचारत आपल्या देशात लोकशाही संपली आहे का? कमी-अधिक प्रमाणात, ध्रुव राठी यांनी सर्वच मुद्दे उपस्थित केले आहेत जे विरोधी पक्ष नेते वेळोवेळी उपस्थित करतात. ३० मिनिटांच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. दोन दिवसांपासून हा व्हिडिओ व्हायरल होत असून आता पर्यत ७० लाख लोकांनी पाहिला आहे.

या व्हिडिओसाठी ध्रुव राठीने महिन्याभरात घडलेल्या काही घटनांचा आधार घेतला आहे. त्यामध्ये ध्रुव राठीने ईडी आणि सीबीआयसारख्या सरकारी एजन्सींच्या कामावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच या एजन्सींचा गैरवापर केल्याचा आरोपही सरकारवर करण्यात आला आहे. यासोबतच देश वन नेशन वन पार्टीकडे वाटचाल करत असल्याचेही म्हटले आहे. ध्रुव राठीने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केला.

ध्रुव राठीच्या या व्हिडीओवर सोशल मीडिया यूजर्स काही त्याचे समर्थन करत आहेत तर काही यूजर्स त्याचा विरोध करताना दिसत आहे. ध्रुव राठीचा हा व्हिडिओ हटवण्याची मागणी काही सोशल मीडिया युजर्स करत आहेत. मात्र या व्हिडिओवर अद्याप भाजपकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.

दरम्यान, ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्याने सरकारवर देशात इस्लामोफोबिक षड्यंत्र सिद्धांताचा प्रचार केल्याचा आरोप करणारा व्हिडिओ अपलोड केला. यासोबतच काश्मीरच्या मुद्द्यावर बनवलेला ध्रुव राठीचा व्हिडिओ माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने काश्मीरच्या नकाशाशी छेडछाड केल्याचे म्हणत व्हिडिओ ब्लॉक केला होता.

कोण आहे ध्रुव राठी ?

मूळचा हरियाणाचा असलेला ध्रुव राठी हा प्रसिद्ध युट्यूबवर आहे, त्याने जर्मनीमधून इंजिनिअरिंग केली. सध्या तो जर्मनीत राहत असून सामान्यतः राजकीय, सामाजिक, पर्यावरण विषयांवर व्हिडिओ बनवतो. त्याचे यूट्यूब चॅनलवर जवळपास 15 लाख सबस्क्राइबर्स आहेत. इंस्टाग्रामवर २.४ मिलियन फॉलोअर्स आहे.

तसेच वैयक्तिक व्लॉग देखील बनवतो त्याच्या दुसऱ्या चॅनेलला देखील लाखो सबस्क्राइबर्स आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याचे महिन्याचे ४० लाख उत्पन्न आहे, तर वर्षाला तो १२ कोटी कमावतो. त्याची ५८ कोटी एकुण संपत्ती आहे.

हेही वाचा

नशेत तर्रर्र झालेल्या पोरींना उभंही राहता येईना, पिट्याभाईने दाखवली दवाखान्याची वाट

क्राईम : डॉक्टर फोनवर होते, तो आला आणि मानेवर केले 19 वार, नाशिकचा थरकाप उडवणारा VIDEO

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

NHM Nagpur : राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय