भारतीय समाजव्यवस्था समान नागरी कायद्यासाठी तयार नाही अब्दुर्र रेहमान
९ ऑगस्ट ला जंतर मंतर दिल्ली येथे राष्ट्रीय अल्पसंख्यांक परिषदेचे होणार आंदोलन
पुणे / क्रांतिकुमार कडुलकर : “जगासमोर भारत देशाला अतिशय महत्त्वाचा देश समजला जातो कारण या देशात विविध जाती धर्माचे लोक आनंदाने राहतात म्हणून भारत देशाला सर्वधर्म समभावाचे प्रतीक समजले जाते.”असे मत बिशप थॉमस डाबरे यांनी व्यक्त केले .पुण्यात आज राष्ट्रीय अल्पसंख्यांक परिषदेच्या वतीने समान नागरी कायदा व अल्पसंख्यांक वरील हल्ले यावर चर्चासत्र आयोजित केले होते त्यावेळी डाबरे बोलत होते . भारतीय समाजव्यवस्था समान नागरी कायद्यासाठी तयार नाही तसेच निवडणुका आल्याने समान नागरी कायदा आणला जात आहे, असे मत माजी आय पी एस अधिकारी अब्दुर रहेमान यांनी व्यक्त केले .पुढे ते म्हणाले की ,समान नागरी कायदा संविधानाचे महत्त्व कमी करण्यासाठी आणला जाऊ नये याची काळजी घ्यावी लागेल .घटनेने धर्म स्वातंत्र्य दिले आहे प्रत्येक व्यक्तीला पूर्ण अधिकार दिले आहेत .
देशासमोर अनेक प्रश्न असताना ते सोडवणे महत्त्वाचे आहे परंतु राजकीय फायद्यासाठी हे विधेयक आणले जात असल्याचे मत अब्दुर रहेमान यांनी व्यक्त केले . अल्पसंख्यांक समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी देशभरातील दलित समाज कायम बरोबर राहील असा विश्वास दिल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक भारती यांनी व्यक्त केला .जनमत हे समान नागरी कायद्या विरोधात आहे तसेच अल्पसंख्यांकांवरील देशभरातील हल्ले हा चिंतेचा विषय असल्याचे नमुद करुन राहुल डंबाळे यांनी यावेळी राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेने केलल्या कार्य सांगितले तसेच ९ ऑगष्ट रोजी जंतर मंतर दिल्ली येथे अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नासाठी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले .तसेच ऑक्टोबर २०२३ मध्ये गोलमेज परिषद घेणार असल्याचे जाहीर केले .
समान नागरी कायदा तसेच देशभर होत असलेल्या – अल्पयंख्यांक समाजावर होत असलेल्या आत्याचारासंदर्भात नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने आज पुणे येथे राष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते .नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांचे अध्यक्षतेखाली हे चर्चासत्र झाले यावेळी बिषप थॉमस डाबरे, माजी आयपीएस अधिकारी अब्दुर्र रेहमान, दिल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते, अशोक भारती, बलिग नौमानी, तेलंगना येथील सामाजिक कार्यकर्ता खालिदा परविन, दिल्ली अल्पसंख्याक आयोगाचे माजी सदस्य ए.सी. मायकल ,कारी इद्रीस, माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, रशिद शेख, बिशप प्रदीप चांदेकर ,बिशप सॅम्युअल , जलील शेख , प्रशांत म्हस्के, सुवर्णा डंबाळे, जाहीद शेख , मु्फ्ती शाहीद , स्नेहा माने , अर्चना केदारी , स्वाती गायकवाड , छाया कांबळे ,अब्दुल माजिद , किरण सोनावणे , किरण गायकवाड , नागेश भोसले यांचेसह देशभरातील मान्यवर उपस्थित होते .सदर चर्चासत्राचे आयोजन नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे राहुल डंबाळे,लूकस केदारी व जुबेर मेमन यांनी केले होते .कार्यक्रमास अल्प संख्यांक समूदायासाठी काम करणारे प्रमुख विचारवंत ,पदाधिकारी यावेळी उपस्थित होते .
चिखली जाधववाडी येथे येथील धोकादायक उताराचा रस्ता सुरक्षित करा – रोहन चव्हाण
नितेश राणे यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा, तृतीयपंथीचे पुण्यात आंदोलन
जागतिक लोकसंख्यादिनी सुखी जोडप्यांचा सन्मान