Sunday, December 22, 2024
Homeराज्यदहावीच्या निकालाबाबत महत्वाची बातमी, आता प्रतिक्षा संपली

दहावीच्या निकालाबाबत महत्वाची बातमी, आता प्रतिक्षा संपली

मुंबई : नुकताच बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला आहे. आता दहावीचा कधी लागणार या बाबत पालक आणि विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली आहे. विद्यार्थी दहावीच्या निकालाची प्रतीक्षा करत असताना महत्वाची माहिती समोर आली आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीचा निकाल दुसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागेल असं सांगितलं होतं. त्यानुसार नुकताच बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. आता बारावी प्रमाणे दहावीच्या देखील निकाल 15 जून 2022 पर्यंत लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र बोर्डाचे १६ लाखांहून अधिक विद्यार्थी दहावीच्या या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. बोर्डाने उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली असून काही दिवसांत निकालही जाहीर केला जाईल. 

महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा मार्च २०२२ मध्ये झाली होती. काही दिवसांपूर्वीच बोर्डाने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला होता, आता लवकरच दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना सीट नंबर आणि आईचं नाव टाकून निकाल पाहता येणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 64 पदांसाठी भरती, 25000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे 113 रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

संबंधित लेख

लोकप्रिय