Saturday, October 5, 2024
Homeआरोग्यसोनू सूद ठरला देवदूत ; चिमुरडीच्या शस्त्रक्रियेचा उचलला संपूर्ण खर्च !

सोनू सूद ठरला देवदूत ; चिमुरडीच्या शस्त्रक्रियेचा उचलला संपूर्ण खर्च !

बिहार :  बिहारमधील चौमुखी कुमारी या दिव्यांग मुलीसाठी अभिनेता सोनू सूद देवदूत बनून पुढे आला आहे. या मुलीची सुरतमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. सोनुने केलेल्या मदतीमुळे आता ती आनंदी आयुष्य जगू शकते.मात्र, अजून काही दिवस मुलीला रुग्णालयातच राहावे लागणार आहे. यानंतर ती सामान्य मुलींप्रमाणे रुग्णालयातून बाहेर येईल, असे सांगण्यात येत आहे.

सरकारी नोकरी : इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत 8106+ जागांसाठी बंपर भरती, आजच करा अर्ज

अभिनेता सोनू सूदने स्वतः चौमुखी कुमारीच्या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च उचलला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. वारिसलीगंज, नवाडा येथील हेमदा गावातील बसंत पासवान यांची मुलीला जन्मापासूनच चार हात आणि चार पाय होते. गरिबीमुळे बसंतला आपल्या मुलीवर योग्य उपचार करता आले नाहीत. चौमुखीच्या या अवस्थेची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली, त्यानंतर सोनू सूदने तिला मदत केली.

नवीन भरती : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

याआधी चौमुखीचे वडील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जात असत. तेव्हा त्यांना पाहून डॉक्टरही थक्क व्हायचे. डॉक्टरांना समजत नव्हते की काय करावे? मुलीचे आई-वडील परिस्थितीन खूप गरीब आहेत. वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आपल्या मुलीवर महागड्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1920 रिक्त पदांसाठी भरती, 13 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

चौमुखी कुमारीच्या कुटुंबात पाच सदस्य असून त्यापैकी चार दिव्यांग आहेत. बसंत पासवान, पत्नी उषा देवी, त्यांच्या कडेवर असणारे बाळ, चौमुखी यांच्याशिवाय 11 वर्षांचा मुलगाही अपंग आहे. या जोडप्याला एकूण तीन मुले आहेत. दोघेही स्वत:अपंग आहेत, दोन मुलेही अपंग आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर प्रशासकीय कर्मचारी या दिव्यांग कुटुंबासाठी काय करतात, हे पाहायचे आहे. सध्या सोनू सूदने या कुटुंबातील मुलीच्या आयुष्यात आनंद भरला आहे.

दहावीच्या निकालाबाबत महत्वाची बातमी, आता प्रतिक्षा संपली

संबंधित लेख

लोकप्रिय