Friday, November 22, 2024
Homeराष्ट्रीयअक्षय कुमार आणि आलिया भारतात राहु शकतात तर मी का राहु शकत...

अक्षय कुमार आणि आलिया भारतात राहु शकतात तर मी का राहु शकत नाही, सीमा हैदरची राष्ट्रपतींकडे दया याचिका

नवी दिल्ली : पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात पळून आलेली सीमा हैदर सध्या चर्चेत आहे. जनताही सीमा आणि सचिनच्या बातम्या मोठ्या उत्सुकतेने पाहत आहे आणि ऐकत आहे. आता सीमाने भारतात राहण्यासाठी भारताचे नागरिकत्व देण्याची विनंती केली आहे.

पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरने राष्ट्रपतींकडे केलेल्या दया याचिकेत केली आहे. सीमा म्हणते की, सचिनसोबत खरे प्रेम केले आहे. आम्ही लग्नही केले आहे. मी आता भारताची सून झाली आहे. तसेच मी हिंदू धर्म स्वीकारला आहे. त्यामुळे मला भारताचे नागरिकत्व देण्यात यावे, अशी विनंती तिने केली आहे.

सीमा हैदर अधिवक्ता एपी सिंह यांच्यामार्फत ही दया याचिका दाखल केली आहे. सीमा हैदरने आपल्या 38 पानी दया याचिकेत भारतीय नागरिकत्वाची मागणी केली आहे. सीमा हैदर म्हणाली की, अक्षय कुमार आणि आलिया भट्ट हे विदेशी नागरिक जर या देशात राहू शकतात तर ती का राहू शकत नाहीत? असे म्हटले आहे.

पुढे म्हटलं आहे, मी कधीच खोटे बोलले नाही. दहशतवादीविरोधी पथक सध्या त्यांचा तपास करीत आहे, परंतु मी सीबीआय, रॉ, राष्ट्रीय तपास संस्थेच्या तपासालाही सामोरे जाण्यास तयार आहे, असे तिने म्हटले आहे. तसेच पॉलीग्राफ चाचणी, ब्रेन मॅपिंग चाचणी, लाय डिटेक्टर चाचणी आणि डीएनए चाचणीसाठी माझी तयारी आहे, असेही ती म्हणाली.

दरम्यान, सध्या सीमा हैदरचा एटीएस तपास करीत आहे. दोन दिवसांत 18 तास एटीएसने सीमा हैदरची चौकशी केली आहे.

हे ही वाचा :

पश्चिम बंगाल मध्ये मणिपूरची पुनरावृत्ती; महिला उमेदवाराची विवस्त्र धिंड

ब्रेकिंग : ‘या’ 4 जिल्ह्यांना आज ‘रेड ॲलर्ट’ ; तर “या” जिल्ह्यांना ‘ऑरेंज ॲलर्ट’

डॉ. आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याच्या निषेधार्थ आंबेडकर अनुयायांचा ‘लॉग मार्च’

भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार माहिती आहेत का? तर ‘हे’ आमदार सर्वात गरीब…यादी पहा !

हातभट्टीमुक्त गाव संकल्पना राज्यात राबविण्याचा सरकारचा विचार

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अनुषंगाने लवकरच सर्वंकष धोरण – गृहनिर्माणमंत्री अतुल सावे

सहायक सरकारी अभियोक्ता गट-अ पदभरतीसाठी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

संबंधित लेख

लोकप्रिय