Saturday, July 6, 2024
Homeजिल्हाIchalkaranji : प्रीपेड मीटर्स विरोधात समाजवादी पक्षाच्या वतीने निदर्शने

Ichalkaranji : प्रीपेड मीटर्स विरोधात समाजवादी पक्षाच्या वतीने निदर्शने

इचलकरंजी : महावितरण कंपनीने आणि राज्य सरकारने प्रीपेड मीटर्स लावण्याची योजना रद्द करावी. 300 युनिटच्या आज वीजवापर असणाऱ्या सर्व म्हणजे दोन कोटी पाच लाख ग्राहकांचे मीटर्स बदलू नयेत. त्यांचे मीटर्स आहेत तेच ठेवावेत आणि प्रीपेड मीटर च्या खर्चाचा कोणताही भार त्यांच्यावर लावू नये. ichalkaranji

या मागणीसाठी आज इचलकरंजी शहर समाजवादी पार्टीच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आणि त्यानंतर महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री प्रशांत राठी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. Ichalkaranji

महावितरण कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या या निदर्शनाच्या सुरुवातीस महावितरण कार्यालयासमोर “प्रीपेड मीटर्स हटाव, प्रीपेड योजना रद्द करा, प्रीपेड मीटर्स घेणार नाही, केवळ घोषणा आणि आश्वासन देणाऱ्या राज्य सरकारचा आणि कंपनीचा धिक्कार असो, प्रीपेड मीटर्सचा कायदा अदानीचा फायदा” अशा विविध घोषणा सुरुवातीस देण्यात आल्या. Ichalkaranji

त्यानंतर समाजवादी पार्टीचे इचलकरंजी शहर अध्यक्ष जाविद मोमीन, महिला आघाडीच्या अध्यक्षा उषा कांबळे, बाबा नदाफ, मुकुंद माळी आणि प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांनी प्रीपेड मीटर्स योजनेच्या संदर्भामध्ये तपशीलवार माहिती दिली आणि योजना रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

उर्जामंत्री आणि महावितरण कंपनी यांनी ज्या पोस्ट टाकल्या आहेत, त्या केवळ घोषणा असून कोणताही अधिकृत निर्णय कंपनीने अथवा महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. तो त्वरित घ्यावा आणि राज्यातील दोन कोटीहून अधिक सर्वसामान्य गरीब वीज ग्राहकांना या बोजातून मुक्त करावे अशी मागणी करण्यात आली.

प्रशांत राठी यांना निवेदन दिल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

या निदर्शनामध्ये विजय जगताप, अशोक चौगुले, रफिक नायकवडी, जयप्रकाश जाधव, पद्माकर तेलसिंगे, अनिल होगाडे, संजय होगाडे, श्रीमती सुष्मिता साळुंखे, रंगराव बोंद्रे, सुरेश आमाशी, जयराज होगाडे, अस्लम शेख, संजीवनी चिंगळे, अशफाक गवंडी, सिकंदर मुल्ला व अन्य अनेक मान्यवर सहभागी झाले होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली

धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ

ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात लवकरच पाच फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळा

ब्रेकिंग : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी ; पर्यटनस्थळी नवीन सुरक्षा नियम लागू !

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; आजच करा अर्ज!

मोठी बातमी : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा

ब्रेकिंग : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; पीक विमा योजनेच्या अर्जासाठी जास्त पैसे मागितल्यास तक्रार करा!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय