(मुंबई) :- राज्यात “मिशन बिगिन अगेन”ला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज यांनी राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये संवाद साधला.
मिशन बिगिन अगेनमध्ये राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायांत हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान लक्षात घेऊन हा उद्योग परत सुरू करण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यपद्धती तयार केली असून ती अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार आहे असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी हॉटेल व्यवस्थापनांनी कामगार व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये असे सांगून मुंबई व शहरांतील हॉटेल्स कोरोना युद्धात सोबत आहेत त्यासाठी त्यांचे अभिनंदन केले. पर्यटन व्यवसायातील महत्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स, लॉजेस सुरु करण्यापूर्वी काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल असे सांगितले आहे.