Monday, December 23, 2024
Homeजिल्हाडॉ.राजेश देशमुख यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी सन्मान

डॉ.राजेश देशमुख यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी सन्मान

पुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना राज्य निवडणूक आयोगाने उत्कृष्ट जिल्हाधिकारी हा सन्मान घोषित केला आहे. त्यांनी जिल्ह्यात मतदार जागृती अभियान सुरू करून त्यामुळे या मोहिमे अंतर्गत जिल्हयात तब्बल 2 लाख 70 हजार 665 इतक्या नवीन मतदारांची नोंदणी केली आहे. 

पुणे जिल्ह्यात 1 जानेवारी ते 5 डिसेंबर 2021 या कालावधीत एकुण 1223413 फॉर्म प्राप्त झालेले होते. यापैकी 1223401 फॉर्मवर अंतिम निर्णय घेण्याची कार्यवाही पुर्ण केली आहे. मतदार नाव नोंदणी अभियान, छायाचित्र नसलेले मतदार, देह व्यवसाय करणाऱ्या स्त्रियां व तृतीय पंथी मतदार होण्यासाठी घेतलेली विशेष मोहीम, मतदार जनजागृती अभियानामध्ये अतिशय मोलाची कामगिरी केली आहे.

मोबाईल खरेदी करताय ? ‘या’ कंपनीनं आणला 8,499 रुपयांमध्ये स्वस्त फोन, 6,000 mAh बॅटरी पाच दिवस चालणार चार्जिंगविना

राज्य निवडणूक आयोगाने पुण्याचे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी हा सन्मान घोषित केला आहे. 

डॉ.राजेश देशमुख दर गुरुवारी बैठक घेऊन सर्व अधिकारी, कर्मचारी यांना प्रोत्साहन देऊन ही मोहीम राबवत होते. विशेषतः उपेक्षित वर्गामध्ये आणि महिलांमध्ये विशेष जागृती कार्यक्रमांचे आयोजन करून मतदार नोंदणी अभियान त्यांनी पूर्ण केले. 37,59,289 महिला मतदारांच्या तुलनेत यावर्षी प्रारुप मतदार यादीमध्ये 1,17,959 व अंतिम मतदार यादीमध्ये 1,48,151 महिला मतदारांची नोंदणी झालेली आहे. विशेषतः ग्रामीण महिला मध्ये सर्वात जास्त नोंदणी झाली आहे.

गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा

ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’

संबंधित लेख

लोकप्रिय