Thursday, July 18, 2024
Homeराष्ट्रीयदलित नवरदेव घोडीवर चढल्याने सवर्णांकडून नवरदेवाच्या घरावर दगडफेक, पोलिसांच्या संरक्षणात लग्नाची मिरवणूक

दलित नवरदेव घोडीवर चढल्याने सवर्णांकडून नवरदेवाच्या घरावर दगडफेक, पोलिसांच्या संरक्षणात लग्नाची मिरवणूक

भोपाळ : मध्य प्रदेशातील सागरमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. अनुसूचित जातीचा नवरदेव आपल्या लग्नाच्या मिरवणूकीत घोडीवर चढल्याने गावातील सवर्णांनी रात्रीच्या वेळी नवरदेवाच्या घरावर दगडफेक केली. तसेच  वाहनांच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे.

दलित नवरदेवाच्या लग्नाच्या मिरवणूकीत घोडीवर बसण्यावरून वाद निर्माण झाला होता, त्यामुळे लग्नाची मिरवणूक पोलिसांच्या संरक्षणात काढण्यात आली, मात्र गावात वर्चस्व असलेल्या लोधी समाजाच्या लोकांनी रात्री नवरदेवाच्या घरावर आणि आसपासच्या घरांवर दगडफेक केली. बाहेर असलेल्या वाहनांच्या देखील काचा फोडण्यात आल्या. या घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त तैनात करून २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या संबंधीचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

एकिकडे राजकारणी मंडळी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या लोकांच्या घरी जाऊन जेवण केल्याचे फोटो व्हायरल करत असताना दुसरीकडे अनुसूचित जातीच्या नवरदेवाला घोडीवर चढण्याला विरोध केला जात आहे. 

संसदेत सादर केलेल्या आकडेवारीवरून, दलितांवरील अत्याचाराच्या बाबतीत मध्य प्रदेश देशात चौथ्या क्रमांकावर आहे, तर आदिवासींवरील अत्याचाराच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. घोडीवर बसू न दिल्याच्या घटनांमध्ये २०१८ ते २०२० या कालावधीत देशभरात दलितांविरोधातील १,३८,०४५  गुन्ह्यांची नोंद झाल्याचे सरकारी आकडे आहेत. त्याच बरोबर उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थाननंतर मध्य प्रदेश १६,९५२ प्रकरणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. २०२० मध्ये आदिवासींवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये २० टक्के वाढ झाली असून २४०१ प्रकरणांसह मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय