Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

‘ह्याच्यावर संस्कार झाले आहेत… फक्त नथूरामाचे’, जितेंद्र आव्हाडांचा फोटो शेअर करत भाजपावर निशाणा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आता या धमकी प्रकरणाने एक वेगळेच वळण घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतच फोटो शेअर करत भाजपावर निशाणा साधला आहे.

---Advertisement---

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं ?

‘पवार साहेबांना मारण्याची धमकी देणारा हाच तो पिंपळकर. हेच NCP चा कार्यकर्ता असता आणि असा फोटो असता तर …. बोंबाबोंब….., ह्याच्यावर संस्कार झाले आहेत ……..फक्त नथू रामाचे’ असे ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. आता भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे नेमकी काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

---Advertisement---

काल शरद पवार यांनी दोघांकडून धमकी

शरद पवार यांना काल ट्विटरवरून धमकी देण्यात आली होती. पहिली धमकी ही ‘राजकारण महाराष्ट्राचे’ या फेसबुक पेजवरुन ‘नर्मदाबाई पटर्धन’ नावाच्या आयडीवरुन देण्यात आली आहे. ‘शरद पवार भाडखाव तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी या फेसबुकवरून देण्यात आली आहे.

तर दुसरी धमकी ही ‘सौरभ पिंपळकर’ नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर दिली आहे.

या धमकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले होते. धमकी देणाऱ्यांपैकी सौरभ पिंपळकर हा तरुण भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला जातोय. आता जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटवर फोटो शेअर केला आहे.

हे ही वाचा :

‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना’ आहे तरी काय ? वाचा !

खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ – केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

शरद पवार यांना धमकी देणाऱ्याचे या राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल, धमकी देणारा कोणत्या पक्षाचा ?

मोठी बातमी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी

ब्रेकिंग : Facebook आणि Instagram वापरण्यासाठी आता मोजावे लागणार पैसै, वाचा म्हटलंय कंपनीने

गावाचा विकास साधायचाय ? चला तर समजून घेऊया सर्वंकष ग्रामविकास आराखडा…

आदिवासी विभागांतर्गत विद्यार्थ्यांसाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘स्वयम्’ योजना’ वाचा सविस्तर!

---Advertisement---

‘आया बहिणी या सरकारच्या राज्यात सुरक्षित नाहीत’, आव्हाड म्हणाले, ‘धार्मिक गोष्टींच्या राजकारण…’

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सहायक उद्यान निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles