Junnar (आनंद कांबळे) : आजच्या मोबाईल युगात वाचन संस्कृती व चळवळ समृद्ध करण्यासाठी व विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी म्हणून पुस्तक महोत्सवानिमित्त ‘शांतता पुणेकर वाचत आहेत’ या उपकमातंर्गत जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिव छत्रपती महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना, डायमंड पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवस भव्य ग्रंथ प्रदर्शन व विक्री हा उपक्रम आयोजित केला आहे.
सदर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन दि. ११ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वा संस्थेच्या खजिनदार कांताताई मस्करे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. हे ग्रंथ प्रदर्शन दि ११ ते १३ डिसेंबर २०२४ या कालावधीत सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजे पर्यत सर्वांसाठी खुले असणार आहे. अशी माहिती डायमंड पब्लिकेशनचे प्रकाशक दत्तात्रय पाष्टे यांनी दिली. तसेच ऐतिहासिक, धार्मिक, राजकिय, शैक्षणिक, कथा कादंबरी, कवितासंग्रह, विनोदी कथा, व्यक्तिमत्व विकास, स्पर्धा परीक्षा व बालसाहित्य अशी विविध एकूण पंचवीस हजार पुस्तके या ग्रंथ प्रदर्शनात ठेवले असून वाचकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
या पुस्तक व ग्रंथ प्रदर्शनानासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे व विश्वस्त मंडळाचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष प्रतिनिधी प्रा विलास कुलकर्णी, प्राचार्य डॉ महादेव वाघमारे, उपप्राचार्य डॉ रविंद्र चौधरी, कला विभाग प्रमुख डॉ अभिजित पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयक प्रा प्रतिभा लोढा, पर्यवेक्षक प्रा समीर श्रीमंते, प्रबंधक प्रा मनिषा कोरे व प्रभारी ग्रंथपाल वंदना चव्हाण, ग्रंथालय कर्मचारी वर्ग व मान्यवर मंडळी, पुस्तकप्रेमी वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Junnar
हे ही वाचा :
मोठी बातमी : पुण्यातील 10 हजार महिलांचे अर्ज अपात्र ; काय आहे कारण?
धक्कादायक : पत्नीच्या छळाला कंटाळून इंजिनियरची आत्महत्या, तब्बल 24 पानांची लिहली सुसाईड नोट
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कहर, शाळांच्या वेळेत बदल
मोठी बातमी : ‘वेलकम’ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्याचे अपहरण, खंडणीसाठी 12 तास टॉर्चर
ब्रेकिंग : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या विविध परिक्षांचा निकाल जाहीर
बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करणाऱ्या कंपनीच्या सूत्रधारास अटक
बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती
नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम अंतर्गत 275 जागांसाठी भरती
जुन्नर : आपटाळे बीटस्तरीय स्पर्धेत उच्छिल शाळेचे मोठे यश