Tuesday, June 18, 2024
Homeताज्या बातम्यावक्फ मंडळाला दिलेल्या निधीवरून झालेल्या वादावर सरकारचे स्पष्टीकरण, वाचा काय आहे...

वक्फ मंडळाला दिलेल्या निधीवरून झालेल्या वादावर सरकारचे स्पष्टीकरण, वाचा काय आहे सरकारची भुमिका

मुंबई : केंद्र शासनाच्या वक्फ विषयक संयुक्त संसदीय समितीने 2007 मध्ये राज्याला भेट दिली असता तत्कालीन राज्य शासनाने वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी अनुदान देण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यास अनुसरून तत्कालीन राज्य शासनाने या मंडळाच्या बळकटीकरणासाठी अनुदान देण्याची योजना 2011 पासून सुरू केलेली आहे. या योजनेनुसार अल्पसंख्यांक विकास विभागाद्वारे वक्फ मंडळाच्या (Waqf Board) बळकटीकरणासाठी दरवर्षी मागणीप्रमाणे निधी अर्थसंकल्पीत केला जातो. यावर्षी देखील 10 कोटींच्या तरतुदीपैकी 2 कोटी निधी हा मागणीप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांना वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

केंद्र शासनाद्वारे देशात वक्फ कायदा 1995 लागू करण्यात आलेला या कायद्यातील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. वक्फ मंडळ हे वैधानिक मंडळ असून राज्यातील वक्फ मालमत्ता संबंधित कामकाजाचे संनियंत्रण करण्याची जबाबदारी मंडळावर आहे. ज्याप्रमाणे राज्यांमधील धर्मादाय संस्थांचे संनियंत्रण धर्मादाय आयुक्त कार्यालयाद्वारे करण्यात येते, त्याचप्रमाणे राज्यातील वक्फ संस्थांचे सनियंत्रण राज्य वक्फ मंडळामार्फत करण्यात येते. वक्फ मालमत्ता या दान स्वरूपात दिलेल्या मालमत्ता असून सदर मालमत्तांच्या उत्पन्नातून गोरगरीब, गरजू लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची जबाबदारी वक्फ मंडळाची आहे. लाभार्थ्यांमध्ये मुस्लिमेत्तर लोकांचा देखील समावेश असतो. तथापि वक्फ मंडळाचे प्रशासन अधिक सक्षम व बळकट व्हावे यासाठी राज्य शासनाद्वारे 2011 पासून उपरोक्त योजना सुरू केलेली आहे.

Waqf Board

राज्यात अल्पसंख्याक विकास विभाग कार्यरत असून अल्पसंख्याक नागरिकांना उच्च शिक्षण देणे, त्यांना रोजगारांच्या संधी, कौशल्य विकास, विविध व्यवसायासाठी अर्थसहाय्य देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न विभागाद्वारे कायम सुरू असतात. त्यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार निर्णय घेत असतात.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सरकार ऍक्शन मोड मध्ये

सिक्किममध्ये तिस्ता नदीचा कहर, अनेक भाग पाण्याखाली; 1500 पर्यटक अडकले!

ब्रेकिंग : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची, बातमी शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

अंघोळीच्या साबणाचे तुकडे फेकून देताय ? असा करा उपयोग, हा व्हिडिओ तुमच्यासाठी

ब्रेकिंग : मोफत आधार कार्ड अपडेट संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

‘या’ दोन फायनान्स योजनांतर्गत थकीत कर्जास दंडव्याज माफ

मोठी बातमी : आदिवासी विकास विभागाच्या पदभरतीस तुर्तास स्थगिती, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : मुंबईत १ कोटी रूपये किंमतीचा गांजा जप्त

ICF : इंटीग्रल कोच फॅक्टरीत 680 जागांसाठी भरती; पात्रता 10+ITI

यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आपद्ग्रस्तांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

जलजीवन मिशनच्या कामासंदर्भात मंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश

ब्रेकिंग : आता शालेय पोषण आहार होणार चवदार ! या १५ खाद्यपदार्थांचा समावेश

मोठी बातमी : सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी, अर्ज दाखल

ब्रेकिंग : अयोध्येतून विजयी झालेल्या सपा खासदाराचा राजीनामा

सीमा सुरक्षा दल अंतर्गत मोठी भरती; पात्रता 10वी/12वी/पदवी/ITI/नर्सिंग/डिप्लोमा

सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी, सरकारकडून “हा” मोठा निर्णय

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय