Friday, September 20, 2024
HomeNewsदिवाळीनिमित्त २० हजार रुपये बोनस द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू

दिवाळीनिमित्त २० हजार रुपये बोनस द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू

सफाई कामगार महिलांचा इशारा, कष्टकरी कामगार पंचायतीची बैठक

सफाई कामगारांना प्रो. फंड न देणाऱ्या स्वयंरोजगार संस्थांवर गुन्हे दाखल करा – आशा कांबळे

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड महापालिकेत कंत्राटी पद्धतीने कामावर असणाऱ्या १६०० सफाई कामगार महिला, पुरुष कर्मचाऱ्यांनी शहराच्या स्वच्छतेत मोलाचे योगदान दिले आहे. या कर्मचाऱ्यांमुळे शहराचा स्मार्ट सिटीमध्ये नावलौकिक झाला आहे. या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागण्यांचा विचार करून न्याय देणे गरजेचे आहे.पुढील आठवड्यात दिवाळी सण आला आहे. या सणानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा. अन्यथा त्या मागणीसाठी महापालिकेवर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा सफाई कामगार महिलांनी दिला आहे.

भोसरी मध्ये कष्टकरी कामगार पंचायतीची बैठक पार पडली. या बैठकीला कष्टकरी कामगार पंचायत पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. यावेळी बोनससाठी लढा देण्याचा निर्धार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या बैठकीवेळी कष्टकरी कामगार महिला घरकाम सभा अध्यक्षा आशा कांबळे,प्रकाश यशवंते, कष्टकरी कामगार पंचायत सरचिटणीस मधुरा डांगे आदींसह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

यावेळी आशा कांबळे म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कायम कामगारांची दिवाळी गोड झाली असून दीड लाखांपेक्षा अधिक रक्कम बोनस म्हणून मिळणार आहे. परंतु, खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवड शहराची साफसफाई करणाऱ्या व या शहराच्या स्वच्छतेमध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या कंत्राटी पद्धतीने कामावर असणाऱ्या सफाई कामगार महिला, पुरुषांवर मात्र अन्याय होत आहे. त्यांनाही दिवाळीनिमित्त २० हजार रुपये बोनस मिळणे गरजेचे आहे. सफाई कामगार महिलांचा सण गोड झाला पाहिजे. या कर्मचाऱ्यांचा पीएफ न भरणाऱ्या स्वयंरोजगार संस्थावरती गुन्हा दाखल करावे व त्यांच्याकडून प्र. फंडाचे रक्कम वसूल करण्यात यावे संस्थांवर गुन्हे दाखल करावे. त्यांच्याकडून किमान वेतनाप्रमाणे फरकाची रक्कम किमान वेतन नियमानुसार वेतन वसूल करावेत.

मधुरा डांगे म्हणाल्या की, महापालिका आयुकांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. महापालिका आयुक्तांनी तातडीने सफाई कामगार महिलांना बोनस द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. बोनस न दिल्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिका समोर दिवाळीमध्ये तीव्र आंदोलन करणार, असा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला असल्याचे नमूद केले आहे.

जाहिरात
Lic
संबंधित लेख

लोकप्रिय